जम्मू-काश्मीरमध्ये नागरिकांच्या सुरक्षेसाठी ४०० बंकर्स बांधणार

नवी देहली – जम्मू-काश्मीरमधील सीमेजवळील भागात पाककडून होणार्‍या गोळीबारापासून संरक्षण करण्यासाठी पुंछ आणि राजौरी भागांत एकूण ४०० बंकर्स बनवण्याचा योजनेला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. पुढील काही मासांमध्ये हे बंकर्स बनवण्यात येतील. या बंकर्समुळे सीमेपलीकडून होणार्‍या गोळीबारामुळे लोक सुरक्षित राहू शकतात, असे मत स्थानिक लोकांनी व्यक्त केले आहे. गेल्या काही दिवसांत सातत्याने पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. यात ३ जणांचा मृत्यूही झाला आहे. (बंकर्स बांधणारे नव्हे, तर पाकचे बंकर्स नष्ट करणारे सरकार हवे ! – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now