शिवप्रदक्षिणा व्रत

हे एक काम्य व्रत आहे.

तिथी : वैशाख, श्रावण, कार्तिक किंवा माघ यांपैकी एखाद्या मासात हे व्रत करतात.

व्रत करण्याची पद्धत : व्रताची दीक्षा घेतल्यावर शिवपूजा करून शिवलिंगाला एक लक्ष प्रदक्षिणा घालणे, हा या व्रताचा प्रधान विधी आहे. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर व्रताचे उद्यापन करतात. उद्यापनाच्या वेळी उमा-महेश्‍वर यांच्या सुवर्णप्रतिमेची पूजा, तसेच होम करतात. त्यानंतर ब्राह्मणभोजन घालून सर्व पूजोपकरणे ब्राह्मणाला दान देेतात.

निषेध : दान घेणे, परान्न ग्रहण करणे, असत्य बोलणे, शिव आणि श्रीविष्णु या देवतांच्या निंदकांशी संबंध ठेवणे इत्यादी व्रतकालातील निषेध आहेत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now