पाकच्या जनतेने ‘भारतीय’ समजून मारहाण केलेल्या त्यांच्याच वैमानिकाचा मृत्यू

पाकच्या सैन्याप्रमाणेच तेथील जनतेमध्ये भारताविषयी किती द्वेष आहे, हे लक्षात येते ! या द्वेषापायी त्यांना ते काय करत आहेत, हेही लक्षात येत नाही ! अशी ‘आत्मघाती’ जनता शेवटी स्वतःच्याच देशाचा विनाश घडवून आणते !

इस्लामाबाद – भारताने पाकमध्ये घुसून केलेल्या कारवाईनंतर २७ फेब्रुवारीला सकाळी पाकच्या २० विमानांनी भारतात घुसखोरी केली. त्यांना पिटाळून लावतांना भारतीय लढाऊ विमानाकडून पाकचे एफ् १६ विमान पाडण्यात आले. तसेच भारताचेही ‘मिग २१ बायसन’ हे विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोसळले. या दोन्ही विमानांचे वैमानिक पॅराशूटच्या साहाय्याने खाली उतरले. पाकच्या नागरिकांनी या दोघांना वेगवेगळ्या ठिकाणी पकडले आणि मारहाण केली. यात भारताचे वैमानिक अभिनंदन वर्थमान त्यांच्याकडील बंदुकीमुळे या मारहाणीपासून वाचले; मात्र पाकचे वैमानिक शाहनाज यांना पाकच्या नागरिकांनी पकडले. तेथील लोकांनी ‘ते भारताचे वैमानिक आहेत’, असे  समजून त्यांना अमानुष मारहाण केली. यात ते घायाळ झाले. त्यांना रुग्णालयात भरती करावे लागले. त्यांचा उपचाराच्या वेळी मृत्यू झाला आहे. शाहनाज यांचे कुटुंब सैन्यात आहे. त्यांचे वडील पाकच्या वायूदलात होते.

जेव्हा ही मारहाणीची घटना घडली, तेव्हा पाकच्या सैन्याने भारताचे २ वैमानिक पकडल्याचे म्हटले होते. म्हणजेच पाकच्या सैन्यालाही त्यांच्याच वैमानिकाची खरी माहिती समजू शकलेली नव्हती. यावरून पाक हास्यास्पद ठरला आहे.


Multi Language |Offline reading | PDF