कांजिवरा (रत्नागिरी) येथील मदरशातील धर्मांध विद्यार्थ्यांनी दिल्या ‘पाकिस्तान झिंदाबाद’ आणि ‘हिंदुस्थान मुर्दाबाद’च्या घोषणा !

राष्ट्रप्रेमी हिंदूंनी घोषणा देणार्‍यांना क्षमा मागायला लावली !

  • अस्तित्वात नसलेल्या ‘हिंदु आतंकवादा’विषयी टाहो फोडणारे आता कुठे आहेत ?
  • केवळ सीमेवर नाही, तर देशातील कानाकोपर्‍यात देशद्रोही धर्मांध आहेत. शत्रूराष्ट्राची पाठराखण करणार्‍या गद्दार धर्मांधांची नांगी ठेचण्याचे धैर्य मोदी सरकार कधी दाखवणार ?

मुंबई, २ मार्च (वार्ता.) – पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन आतंकवाद्यांचे अड्डे नेस्तनाबूत केल्याचा पराक्रम करणार्‍या भारतीय सेनेच्या विजयाच्या घोषणा संपूर्ण देशभरात चालू असतांना रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्‍वर तालुक्यातील कांजिवरा, देवरूख येथील मदरशातील काही धर्मांध विद्यार्थ्यांनी मात्र ‘पाकिस्तान झिंदाबाद’ आणि ‘हिंदुस्थान मुर्दाबाद’च्या घोषणा दिल्या. हा प्रकार लक्षात येताच स्थानिक राष्ट्रप्रेमी हिंदु युवकांनी या मदरशामध्ये जाऊन राष्ट्रविरोधी घोषणा देणार्‍या राष्ट्रद्रोही धर्मांध विद्यार्थ्यांना ‘हिंदुस्थान झिंदाबाद’ आणि ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ अशा घोषणा द्यायला लावल्या. या वेळी राष्ट्रप्रेमी हिंदूंनी देशद्रोही घोषणा देणार्‍या धर्मांधांना क्षमा मागायला लावली.(राष्ट्रद्रोही धर्मांधांना खडसावणार्‍या राष्ट्रप्रेमी नागरिकांचे अभिनंदन ! – संपादक) ही घटना २५ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ६ वाजता घडली; मात्र पोलिसांनी याविषयी अद्याप कारवाई केलेली नाही. (राष्ट्रद्रोही घोषणा देऊनही त्यांच्या विरोधात कारवाई होत नसेल, तर असे पोलीस, प्रशासन आणि त्यांना पोसणारी लोकशाही काय कामाची ? राष्ट्राविषयी अभिमान बाळगणारी यंत्रणा उभारण्यासाठी हिंंदु राष्ट्रच आवश्यक आहे !  संपादक)

कांजिवरा मदरशातील धर्मांध विद्यार्थी मदरशाच्या बाजूला असलेल्या मैदानात सायंकाळी क्रिकेट खेळत असतांना त्यांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’ आणि ‘हिंदुस्थान मुर्दाबाद’ अशा घोषणा दिल्या. या वेळी तेथे उपस्थित असलेल्या काही हिंदु युवकांनी हा प्रकार पाहिला. आजूबाजूच्या हिंदूंना हा प्रकार समजताच शेकडो राष्ट्रप्रेमी हिंदू संघटित झाले आणि त्यांनी मदरशामध्ये जाऊन देशद्रोही घोषणा देणारे विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक यांना क्षमा मागायला लावली. या वेळी मदरशातील शिक्षक म्हणाले, ‘‘अशा घोषणा देणे, ही पुष्कळ मोठी चूक झाली. झालेला प्रकार निंदनीय, वाईट आणि चुकीचा आहे. याविषयी कांजिवरा मदरशाच्या वतीने आम्ही सर्वांची क्षमा मागतो. यापुढे असा प्रकार होणार नाही, याची दक्षता आम्ही घेऊ.’’ (मदरशातील शिक्षकांना खरोखरच ही चूक वाटत असेल, तर ते देशद्रोही घोषणा देणार्‍या अशा विद्यार्थ्यांना स्वत:हून पोलिसांच्या स्वाधीन का करत नाहीत ? असे न केल्यास अशा वांझोट्या क्षमेला काहीही अर्थ रहात नाही. हे विद्यार्थी परत अशी आगळीक करतच रहातील !  – संपादक) हे विद्यार्थी बाहेरील राज्यातून आल्याचे मदरशातील शिक्षकांनी सांगितले. त्यावर संतप्त हिंदूंनी हे सर्व विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक यांना त्वरित निघून जाण्याची चेतावणी दिली.

याविषयीचा व्हिडिओ सामाजिक प्रसारमाध्यामांद्वारे सर्वत्र प्रसारित झाल्यावर सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.


Multi Language |Offline reading | PDF