सनातनच्या ‘भावी आपत्काळातील संजीवनी’ या ग्रंथमालिकेतील ग्रंथांचा थोडक्यात परिचय !

भावी भीषण आपत्काळात समाजाला जिवंत रहाता येण्यासाठी विविध उपाय सांगणारे ग्रंथ आधीच प्रसिद्ध करणारे एकमेव द्रष्टे : परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

संत-महात्मे, ज्योतिषी आदींच्या सांगण्यानुसार आगामी काळ हा भीषण आपत्काळ असून या काळात समाजाला अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागणार आहे. सध्या जगभर नैसर्गिक आपत्ती येत आहेत आणि भावी काळात त्यांची तीव्रता आणखी वाढेल. या आपत्तींमध्ये तिसर्‍या महायुद्धाचीही भर पडेल. आपत्काळात स्वतःसह कुटुंबियांच्याही आरोग्याचे रक्षण करणे, हे मोठे आव्हानच असते. आपत्काळात रुग्णाला रुग्णालयात नेणे, डॉक्टर वा वैद्य यांच्याशी संपर्क साधणे आणि पेठेत (बाजारात) औषधे मिळणेही कठीण होते. आपत्काळात ओढवणार्‍या समस्या आणि विकार यांना तोंड देेण्याच्या पूर्वसिद्धतेचा एक भाग म्हणून सनातन संस्था ‘भावी आपत्काळातील संजीवनी’ ही ग्रंथमालिका सिद्ध करत असून आतापर्यंत या मालिकेतील २१ ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. हे ग्रंथ नेहमीसाठीही उपयुक्त आहेत. या सर्व ग्रंथांची थोडक्यात ओळख व्हावी, यासाठी प्रस्तुत सदरात ग्रंथांचे मनोगत प्रसिद्ध करत आहोत. हे सर्वच ग्रंथ वाचकांनी अवश्य संग्रही ठेवावेत; कारण ते भावी आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी अत्यंत उपयोगी आहेत. ‘या ग्रंथांविषयी समाजात अधिकाधिक जागृतीही करून सामाजिक बांधिलकी जपण्यासह समाजऋणही फेडावे’, ही नम्र विनंती !

अग्निहोत्र

(भावी महायुद्धकाळात कुटुंब आणि समाज यांच्या रक्षणासाठी, तसेच नेहमीसाठीही उपयुक्त ग्रंथ !)

ग्रंथाचे संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले, सद्गुरु (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि कु. प्रियांका विजय लोटलीकर

ग्रंथाचे मनोगत

त्रिकालज्ञानी संतांनी सांगितलेलेच आहे की, येत्या आपत्काळामध्ये जगभरातील बरीच लोकसंख्या नष्ट होणार आहे. आता संकटकाळाला आरंभ झालाच आहे. संकटकाळात तिसरे महायुद्ध भडकेल. दुसर्‍या महायुद्धापेक्षा आता जगातील बहुतेक सर्वच राष्ट्रांकडे महासंहारक अशी अण्वस्त्रे आहेत. त्यामुळे ती एकमेकांविरुद्ध डागली जातील. या युद्धामध्ये वाचायचे असेल, तर त्यासाठी अण्वस्त्रे निकामी करणारा प्रभावी उपाय हवा, तसेच त्या अण्वस्त्रांपासून निघणारा किरणोत्सर्ग नष्ट करणाराही उपाय हवा. त्याकरिता स्थुलातील उपाय उपयोगी नाहीत; कारण अणुबाँब हा नेहमीच्या बाँबपेक्षा सूक्ष्म आहे. स्थूल (उदा. बाण मारून शत्रूचा नाश करणे), स्थूल अधिक सूक्ष्म (उदा. मंत्र म्हणून बाण मारणे), सूक्ष्मतर (उदा. नुसते मंत्र म्हणणे) आणि सूक्ष्मतम (उदा. संतांचा संकल्प) असे अधिकाधिक प्रभावशाली टप्पे असतात. स्थुलापेक्षा सूक्ष्म हे कित्येक पटीने प्रभावी असते. त्यामुळे अणुबाँबसारख्या प्रभावी संहारकाचा किरणोत्सर्ग थोपवण्यासाठी सूक्ष्मातील काहीतरी करावे लागेल. त्यासाठी ऋषिमुनींनी यज्ञाचा प्रथमावतार असलेले ‘अग्निहोत्र’ करण्याचा उपाय सांगितला आहे. करण्यास अतिशय सोपा आणि अतिशय अल्प वेळात होणारा; पण प्रभावी असा सूक्ष्मातील परिणाम साधून देणारा हा उपाय आहे. त्यामुळे वातावरण चैतन्यदायी बनते आणि आपल्याभोवती संरक्षककवचही बनते. सामान्यांनी एवढे जरी केले, तरी पुरे आहे. याहूनही प्रभावी, म्हणजे सूक्ष्म उपाय, म्हणजे साधना करणे. साधनेने आत्मबल प्राप्त होते आणि आपल्या कार्याला बळ प्राप्त होते. सामान्य व्यक्तीने अग्निहोत्र करण्याने जो लाभ होईल, तो लाभ साधना करणार्‍या आणि ६० टक्के आध्यात्मिक प्रगती झालेल्या साधकाने केलेल्या नुसत्या प्रार्थनेने साध्य होतो.

अग्निहोत्राचे महत्त्व, ते करण्याची पद्धत आणि त्याचा सूक्ष्मातील परिणाम समजावून देणारा असा हा ग्रंथ सादर करत आहोत. तो अभ्यासल्याने अग्निहोत्राचे, तसेच साधनेचेही महत्त्व सामान्यांना पटावे आणि त्यांना ते आचरणात आणता यावे, ही श्री गुरुचरणी प्रार्थना. – संकलक


Multi Language |Offline reading | PDF