हिंदु राष्ट्र अवतरेल लवकरच या भूतलावरी ।

हिंदु राष्ट्र स्थापनेचे सर्वोच्च ध्येय असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले

विचारांचा गलबला, धर्म-पंथांचा बोलबाला ।
मतमतांचा कली-काला ।
एकमेकांपासूनी दूर लोटतसे हिंदूंना ॥ १ ॥

पाहून ऐशी दुरवस्था भारताची ।
करुणा उपजे गुरुमाऊलीच्या हृदयी ॥ २ ॥

तिने हार केला ऐशा धाग्याचा, जो अखंड नि अतूट झाला ।
चमत्कार तो पहा, स्वभावदोष अन् अहं निर्मूलनाचा ॥ ३ ॥

कृतज्ञता नि शरणागत भाव जागवूनी साधकहृदयी
त्यातून साधकरूपी फुले उमलती जागोजागी अन् देशोदेशी ॥ ४ ॥

हार पहा हो किती सुंदर, किती अद्भुत झाला ।
हिंदु राष्ट्र संकल्प पहा तो सिद्धीस आला ॥ ५ ॥

गुंफिले ऐशा अगणित फुला अतूट धाग्यातूनी
गुरुमाऊलीने समर्पिले या हारा हिंदु राष्ट्र देवतेचरणी ॥ ६ ॥

भिऊ नका, घाबरू नका । धरा हो दृढभाव गुरुचरणी ॥
संकल्प करा, निर्धार करा ।
हिंदु राष्ट्र अवतरेल लवकरच या भूतलावरी ॥ ७ ॥

प.पू. गुरुमाऊली चरणी समर्पित !

– श्री. प्रदीप भास्कर जोशी, श्रीरामपूर, जिल्हा नगर. (१७.११.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF