दुचाकीवरून बंदीश गुणगुणत येतांना दुचाकीसह स्वतः भूमीपासून वर गेल्याचे जाणवणे

‘संगीत आकाशतत्त्वाशी संबंधित आहे; म्हणून पृथ्वी, आप, तेज आणि वायू या तत्त्वांशी संबंधित असलेल्या कलांपेक्षा संगीताशी संबंधित अनुभूती वरच्या स्तराच्या असतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

‘२३.१.२०१९ या दिवशी मी घरून माझ्या दुचाकीने रामनाथी आश्रमात येत होते. त्या वेळी मी ‘जोग’ रागाचे स्वर आणि बंदीश (टीप) गुणगुणत होते. त्या स्वरांनी माझा भाव जागृत झाला. काही क्षणांतच मला ‘मी चालवत असलेल्या दुचाकीसह भूमीपासून मी वर गेले आहे आणि वरून भूमीकडे पहात आहे’, असे स्पष्ट जाणवले. त्या वेळी मला ‘असे का होत आहे ?’, याचे आश्‍चर्य वाटले. ‘संगीत ही आकाशतत्त्वाची साधना असल्याने, तसेच मी गात असलेल्या स्वरांमुळे भावजागृती होऊन शरिराला हलकेपणा येऊन देह वर उचलल्याचे जाणवले असावे’, असे वाटले. (हे शास्त्र बरोबर आहे का ? – तेजल) – हो.

कु. तेजल पात्रीकर

टीप : बंदीश – शास्त्रीय गायनातील रागाचे स्वरूप स्पष्ट करणारे बोलगीत. यालाच ‘छोटा ख्याल’ किंवा ‘चीज’ असेही म्हणतात. ही मध्यलयीत किंवा दृत लयीत गातात.

– कु. तेजल पात्रीकर, संगीत विशारद, रामनाथी आश्रम, गोवा. (२५.१.२०१९)

उद्योगपतींच्या शिबिरात कु. तेजल पात्रीकर यांच्या संदर्भात आलेली अनुभूती

‘१२ ते १४ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत रामनाथी आश्रमात उद्योगपतींसाठी साधना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ‘संगीत साधना’ या विषयावर मार्गदर्शन करतांना ‘कु. तेजल पात्रीकर साक्षात श्री सरस्वतीदेवी असून त्या आमच्याशी बोलत आहे’, अशी अनुभूती आली.’ – श्री. दिनेश महादेव चासकर, खारघर, नवी मुंबई. (१४.२.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF