सभा नसून ही तर आहे धर्मजागृतीची ज्योत ।

‘२.३.२०१९ या दिवशी हडपसर, पुणे येथे होणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या निमित्ताने सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी साधकांचा एक सत्संग घेतला. त्या वेळी सुचलेली कविता.

कु. वैभवी भोवर

सभा नसे ही केवळ ।
ही आहे धर्मजागृतीची ज्योत ॥ १ ॥

गुरुदेव देती संधी साधकांना ।
सिद्ध होऊया लाभ करून घेण्या ॥ २ ॥

सद्गुरूंनी ध्येय दिले व्यष्टी साधनेच्या घडीचे ।
ते साध्य होण्या प्रयत्न करू संघभावाने साधनेचे ॥ ३ ॥

सभेची संधी मिळताच साधक होती सज्ज ।
गुरुदेवांचा आशीर्वाद मिळावा, हाच विचार फक्त ॥ ४ ॥

‘भाव’, ‘तळमळ’ अन् ‘शरणागती’ हे केंद्रबिंदू घेऊनी ।
आपण सर्व सेवक आज ध्येय ठरवूया आपुल्या मनी ॥ ५ ॥’

– कु. वैभवी भोवर, पुणे (१२.२.२०१९)

 


Multi Language |Offline reading | PDF