एस्.एस्.आर्.एफ्.च्या शिबिराच्या काळात सद्गुरु बिंदा सिंगबाळ यांचा सत्संग लाभणे आणि त्यांच्या संदर्भात आलेली अनुभूती

शिबिराच्या काळात सद्गुरु बिंदा सिंगबाळ यांचा सत्संग लाभणे आणि एका रात्री एस्.एस्.आर्.एफ्.च्या संतांसह सत्संग चालू असतांना सद्गुरु बिंदाताई यांच्यावर दैवी कणांचा वर्षाव होत असल्याप्रमाणे त्यांच्या तोंडवळ्यावर सोनेरी दैवी कण दिसणे

सद्गुरु सिरियाक वाले

‘जानेवारी २०१९ मध्ये सनातनच्या रामनाथी आश्रमात एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधकांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या निमित्ताने प्रतिरात्री आम्हाला (पू. भावना शिंदे, पू. शिल्पा कुडतरकर आणि मला) सद्गुरु बिंदाताईंचा सत्संग लाभत होता. ३.२.२०१९ या दिवशी पू. भावना शिंदे अमेरिकेला परत जाणार होत्या. त्याच्या आदल्या रात्री आम्हाला पहाटे ५ वाजेपर्यंत सद्गुरु बिंदाताईंचा सत्संग लाभला. पहाटे साधारण ४ वाजता मला सद्गुरु बिंदाताईंच्या गालावर मोठ्या आकारातील सोनेरी दैवी कण दिसले आणि अर्ध्या मिनिटातच ते नाहीसे झाले. काही मिनिटानंतर त्यांच्या तोंडवळ्यावर पुन्हा मोठे सोनेरी दैवी कण दिसून नंतर ते लगेच नाहीसे झाले. थोड्या वेळात असे अनेकदा झाले. त्या वेळी मला असे वाटले की, जणू त्यांच्यावर दैवी कणांचा वर्षाव होत आहे.

आम्ही पहाटे ५ वाजेपर्यंत सत्संगात होतो, तरीही आम्हाला थकवा जाणवला नाही. उलट चैतन्य आणि उत्साह जाणवत होता.’

– (सद्गुरु) श्री. सिरियाक वाले, युरोप (फेब्रुवारी २०१९)

दैवी कण : सात्त्विक व्यक्ती, स्थान आदी ठिकाणी सोनेरी, रूपेरी आदी अनेक रंगांत दिसणार्‍या या कणांचे ‘भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटर’मध्ये पृथक्करण करण्यात आले. आय.आय.टी. मुंबई येथे केलेल्या चाचणीनुसार या कणांमध्ये कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे घटक असल्याचे सिद्ध झाले. या घटकांच्या मूलद्रव्यांच्या प्रमाणावरून शोधलेले त्यांचे ‘फॉर्म्युले’ सध्या अस्तित्वात असलेल्या कोणत्याही कणांच्या ‘फॉर्म्युल्या’शी मिळतीजुळती नाहीत. त्यामुळे हे कण नाविन्यपूर्ण आहेत, हे लक्षात येते. साधक या कणांना ‘दैवी कण’ असे संबोधतात.

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now