रामनाथी आश्रमात ‘सौर याग’ झाल्यानंतर पूजास्थानी देवतांचे दर्शन घेतांना परात्पर गुरु डॉक्टरांच्या मागे सूर्यदेवाचे दर्शन होऊन त्याच्याकडून पुष्कळ तेज प्रक्षेपित होतांना दिसणे

सद्गुरु सिरियाक वाले

‘११.२.२०१९ या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमात ‘सौर याग’ करण्यात आला. यज्ञ संपल्यानंतर मी दर्शन घेण्यासाठी पूजास्थानी गेलो. तेथे डाव्या बाजूला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र, तर उजव्या बाजूला घोड्यांच्या रथावर आरुढ असलेल्या श्री सूर्यदेवाचे चित्र ठेवलेे होते. यापूर्वी मी सूर्यदेवाला कधी पाहिले नव्हते. नमस्कार करण्यासाठी मी डोळे मिटले. तेव्हा सूर्यदेवाच्या ठिकाणी मला परात्पर गुरु डॉक्टरच दिसले. सूर्यदेव परात्पर गुरु डॉक्टरांच्या मागे असून त्याच्याकडून पुष्कळ तेज प्रक्षेपित होत होते. मला ते दोघेही एकच असल्याप्रमाणे आणि त्रिमितीत दिसत होते. त्या दोघांकडून प्रक्षेपित होणारे तेज एकच होते.’

– (सद्गुरु) श्री. सिरियाक वाले, युरोप (फेब्रुवारी २०१९)

(या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now