सद्गुरु सिरियाक वाले यांच्या सत्संगाच्या वेळी अमेरिकेतील सौ. कल्पना शर्मा यांना आलेल्या अनुभूती

सद्गुरु सिरियाक वाले

१. अनुभूती

१ अ. सद्गुरु सिरियाक वाले यांचे नामजपाच्या संदर्भात मार्गदर्शन घेतल्यानंतर भावजागृती होणे, मनात केवळ ‘स्वतःचे अस्तित्व नष्ट होऊन भगवंताशी एकरूप व्हावे’, ही एकच तळमळ असणे आणि ही अवस्था २ – ३ मिनिटे टिकून रहाणे : ‘सद्गुरु सिरियाक वाले घेत असलेल्या एका सत्संगामध्ये मी त्यांना मला नामजप करतांना येणार्‍या अडचणीविषयी विचारले. त्या संदर्भात सद्गुरु सिरियाकदादांनी मला मार्गदर्शन केले. त्यानंतर माझा भाव जागृत झाला अन् माझ्या डोळ्यांतून भावाश्रू वाहू लागले. त्या वेळी माझ्या मनात कोणताही विचार नसून माझे मन रिक्त असल्याचे मला जाणवत होते. माझ्या मनात केवळ ‘स्वतःचे अस्तित्व नष्ट होऊन भगवंताशी एकरूप व्हावे’, ही एकच तळमळ होती. ही अवस्था २ – ३ मिनिटे (किंवा त्याहीपेक्षा अधिक काळ) टिकून होती.

१ आ. संपूर्ण सत्संगामध्ये मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवले.

या अनुभूतीसाठी मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पावन चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करते.

२. सद्गुरु सिरियाकदादांचे मार्गदर्शन ऐकल्यानंतर झालेली विचारप्रक्रिया

सद्गुरु सिरियाकदादांचे मार्गदर्शन ऐकल्यानंतर मला आतून वाटले, ‘देवाला सर्वकाही शक्य आहे. या क्षणीसुद्धा ते मला मुक्त करू शकतात. साधनेसाठी करत असलेले सर्व प्रयत्न, येणारे अडथळे आणि होणारा संघर्ष हे सर्व ‘मला आनंद अनुभवता यावा’, यासाठी आहे. त्यामुळे कोणतीही चिंता न करता सतत ईश्‍वराच्या अनुसंधानात राहून सर्व प्रयत्न करत रहाणे आवश्यक आहे.’

– सौ. कल्पना शर्मा, न्यू जर्सी, अमेरिका. (८.३.२०१८)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now