मुंबई महानगरपालिकेच्या सहआयुक्तांचा सुरक्षा विभागाला २४ घंटे सतर्क रहाण्याचा आदेश

मुंबई – अतिरेक्यांनी पुलवामा येथील आक्रमणानंतर देशात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई महानगरपालिकेचे सहआयुक्त डॉ. किशोर क्षीरसागर यांनी पालिकेच्या सुरक्षा विभागाला २४ घंटे सतर्क रहाण्याचा आदेश दिला आहे. पालिकेच्या सुरक्षा विभागाच्या ५३ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने भांडुप संकुल येथे सुरक्षादलाच्या प्रशिक्षण केंद्राच्या पटांगणावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

या प्रसंगी बोलतांना डॉ. क्षीरसागर म्हणाले की, महापालिकेचे सुरक्षा विभाग पालिकेची विविध कार्यालये, जलवाहिन्या, मालमत्ता, रुग्णालये आदींचे संरक्षण करण्याचे मोठे दायित्व समर्थपणे पार पाडत आहे. त्यामुळे पालिकेच्या सुरक्षारक्षकांनी डोळ्यांत तेल घालून सर्वत्र लक्ष ठेवावे. कुणी व्यक्ती संशयास्पद दिसल्यास त्याविषयी तात्काळ वरिष्ठांना कळवावे.


Multi Language |Offline reading | PDF