जगभरात एकटा पडल्यानेच पाकची अभिनंदन यांना सोडण्याची घोषणा !

नवी देहली – पाकच्या कह्यात असलेले भारतीय वैमानिक विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांची पाकने १ मार्च या दिवशी सोडण्याची घोषणा केली होती. त्यांच्या या सुटकेसाठी भारताने जगभरातून दबाव आणला होता, तसेच पाकला कोणत्याही देशाने साहाय्य न केल्याने शेवटी पाकला वर्थमान यांना सोडवण्यावाचून पर्याय नसल्याचे समोर आले आहे.

१. पाकने संपर्क केलेल्या देशांमध्ये ‘पी ५’ या देशांचाही समावेश होता. भारत ३ पद्धतीने आक्रमक प्रत्युत्तर देण्याची सिद्धता करत असल्याचे पाकने या देशांना सांगितले. ‘भारतीय नौदलाच्या युद्धनौका कराचीकडे पाठवणे, ‘बॅलेस्टिक’ क्षेपणास्त्र डागण्याची योजना आखणे आणि सीमेवर सैनिकांची संख्या वाढवणे’ अशा ३ प्रकारे भारत सिद्धता करत असल्याचे पाकने सांगितले होते.

२. पाकने दिलेल्या माहितीनंतर या देशांनी भारताशी संपर्क करून माहिती घेतली, तेव्हा भारताने पाक फसवणूक करत असल्याचे सांगितले. तसेच ‘भारतीय युद्ध नौका कराचीपासून दूर आहेत. या देशांनी त्यांच्याकडील आकाशातून समुद्रातील हालचाली टिपण्याच्या तंत्रज्ञानाद्वारे याची माहिती घ्यावी’, असे भारताने सांगितले. भारताने पाकमध्ये सैनिकी नाही, तर आतंकवादविरोधी कारवाई केल्याचे सांगितले. उलट पाकिस्ताननेच भारतीय सैन्याच्या तळांवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भारताने केला. पाकच्या किमान २० विमानांनी भारताच्या सैनिकी चौक्यांकडे मार्गक्रमण केले. पाकच्या विमानांनी ‘लेसर गाइडेड’ क्षेपणास्त्र सोडले. यातून भारताचे सैन्यतळ थोडक्यात वाचले.

३. पाकिस्तान खोटे दावे करत असल्याचे भारताने सांगितल्यामुळे ‘पी ५’ देशांपैकी कोणीही पाकसमवेत आले नाही.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now