पोलिसांच्या अनाठायी आक्षेपानंतरही न्यायालयाकडून करीमनगर (तेलंगण) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेला अनुमती !

हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांच्या उपस्थितीला पोलिसांचा आक्षेप !

तेलंगण पोलिसांचा हिंदुद्वेष जाणा ! पोलिसांनी असा आक्षेप कधी १५ मिनिटांत १०० कोटी हिंदूंना संपवण्याची भाषा करणार्‍या ओवैसी यांच्यावर घेतला आहे का ? कि पोलिसांनी ओवैसी यांची अशी विधाने आक्षेपार्ह वाटत नाहीत ?

आमदार टी. राजासिंह

भाग्यनगर – करीमनगर येथे होणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभेला पोलिसांनी घेतलेल्या अनाठायी आक्षेपानंतरही न्यायालयाकडून सभेला अनुमती देण्यात आली. ही सभा २ मार्च या दिवशी होणार आहे. या सभेला तेलंगण येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार श्री. टी. राजासिंह यांना निमंत्रित करण्यात आले होते. पोलिसांनी श्री. राजासिंह यांच्या उपस्थितीवर आक्षेप घेत आयोजकांना ‘सभेला दिलेली अनुमती रहित का करू नये ?’, अशी नोटीस पाठवली. ‘राजासिंह हे प्रक्षोभक भाषणे करत असून त्यांच्यावर अनेक गुन्हेही नोंद आहेत’,  असे पोलिसांनी म्हटले होते. यावर आयोजकांनी न्यायालयात दाद मागितल्यानंतर न्यायालयाने सभेला श्री. राजासिंह यांची उपस्थिती वगळत सर्शत अनुमती दिली.

(याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा लवकरच…)


Multi Language |Offline reading | PDF