कोणतेही काम करण्यास सिद्ध असल्याने घराचा ‘आधार’ बनलेली ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली अकोला येथील कु. प्रतीक्षा प्रशांत पिसोळकर (वय २० वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. प्रतीक्षा पिसोळकर ही एक आहे !

कु. प्रतीक्षा पिसोळकर

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

मूळची अकोला येथील आणि सध्या शिक्षणासाठी वर्धा येथे रहात असलेली कु. प्रतीक्षा प्रशांत पिसोळकर (वय २० वर्षे) हिची तिच्या आईला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

१. गर्भारपणी पूर्ण ८ मास रुग्णालयात रहावे लागणे आणि यजमानांना स्वप्नात ३ वेळा परात्पर गुरु डॉक्टरांचे दर्शन झाल्याने ‘सर्व ठीक होणार’, अशी निश्‍चिती वाटणे

‘यापूर्वी माझा ३ वेळा गर्भपात झाला होता. त्यामुळे ४ थ्या वेळी दिवस राहिल्यावर ‘हे भगवंता, तूच माझ्या गर्भाचे रक्षण कर’, अशी माझी देवाला पुष्कळ प्रार्थना होत होती. प्रसूतीतज्ञांनी मला पूर्ण विश्रांती घेण्यास सांगितले होते आणि त्यामुळे पूर्ण ८ मास मी रुग्णालयातच होते. रुग्णालयात असतांना माझे पती श्री. प्रशांत पिसोळकर यांना ३ वेळा परात्पर गुरु डॉक्टरांचे स्वप्नात दर्शन झाले. तेव्हा ‘सर्वकाही ठीक होणार’, असे गुरुदेवांनी सुचवले आहे’, अशी माझ्या मनात ठाम श्रद्धा निर्माण झाली.

२. बालपणापासून प्रतीक्षाला नामजप आणि सत्संग यांची आवड असणे

लहान असतांना ती कधीच रडायची नाही. ती ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करत झोपायची. ‘बाप माझा हो ज्ञानवंत’ हे भजन ऐकतांना ती हसून प्रतिसाद देत असे. ती ८ – ९ मासांची असतांना तिची काकू (सौ. माया श्रीकांत पिसोळकर) तिला सत्संगाला घेऊन जात असे. तेव्हा ती सत्संगात शांतपणे बसत असे. ती दीड वर्षाची असतांना मी तिला सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत सेवेला घेऊन जायचे. त्या वेळी ती कधीच रडत अथवा त्रास देत नसे.

३. कोणतेही काम करण्याची सिद्धता असणे

तिला कुणी कोणतेही काम सांगितले, तरी ती लगेच ‘हो’ म्हणते. तिला काही अडचण असली, तरी ती ते काम करते. आमच्या घरातील प्रत्येकाचा ‘प्रतीक्षा’ हा एक आधार आहे. ती अकोल्यात असली की, तिच्या लहान बहीण-भावंडांना शिकवणीला सोडणे आणि त्यांची काळजी घेणे, हे सारे सहजतेने करते. या मासात माझे एक शस्त्रकर्म झाले. त्या कालावधीत तिने घरातील सर्व गोष्टी दायित्व घेऊन पूर्ण केल्या.

४. भीती जाऊन धीटपणा येणे

– सौ. माया श्रीकांत पिसोळकर (कु. प्रतीक्षाची काकू), अमरावती

५. समजूतदारपणा

‘ती कोणत्याही गोष्टीसाठी हट्ट करत नाही. एखादी गोष्ट आवश्यक असेल, तरच ती मागते. त्यासाठीही तिचा कधी आग्रह नसतो. ती तिची लहान बहीण आणि भाऊ यांना ‘काय आवश्यक आहे ?’, ते बघते आणि त्याप्रमाणे देण्याचा प्रयत्न करते. तिला एखादी गोष्ट समजून सांगितल्यावर ती लगेच समजून घेते.’ – सौ. माया श्रीकांत पिसोळकर, सौ. प्रज्ञा प्रशांत पिसोळकर, श्री. प्रशांत पिसोळकर (वडील), सौ. भार्गवी आणि श्री. नीरज क्षीरसागर


Multi Language |Offline reading | PDF