विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांची आज सुटका करण्याची पाकची घोषणा

असे असले, तरी भारताने धूर्त पाकच्या विरोधात धडक कारवाई चालूच ठेवणे अपेक्षित आहे !

इस्लामाबाद – पाकच्या कह्यात असलेले भारतीय वैमानिक विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांची १ मार्च या दिवशी सुटका केली जाईल, अशी घोेषणा पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांच्या संसदेत केली. ‘शांततेसाठी ही सुटका करत आहे’, असे त्यांनी सांगितले. (भारताने केलेल्या कारवाईमुळे पाक पूर्णपणे बिथरला आहे; मात्र ‘पाक शांततेचा पुजारी आहे’, अशी आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची प्रतिमा उजळवून घेण्यासाठी इम्रान खान शांततेचा आव आणत आहेत ! – संपादक) भारत आणि पाक यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी पाकने संसदेचे विशेष सत्र बोलावले होते. त्या सत्रात इम्रान खान यांनी ही घोषणा केली. मुळात जिनेव्हा करारानुसार पाकला अभिनंदन यांना सोडणे बंधनकारकच होते, अन्यथा आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याच्याकडून मोठी चूक झाली असती. यामुळेच पाकने सुटका करण्याची घोषणा केली आहे.

इम्रान खान पुढे म्हणाले की,

१. पाकिस्तान किंवा कोणताही देश पुलवामा येथे आतंकवादी आक्रमण कशासाठी करील ? त्यातून पाकला काय मिळणार होते ? (पाक भारताच्या विरोधात थेट काही करू शकत नाही; म्हणून आतंकवाद्यांच्या माध्यमातून कारवाया करत आहे, हे जगालाही ठाऊक आहे. त्यामुळे इम्रान खान यांनी साळसूदपणाचे कितीही सोंग घेतले, तरी त्यांचा खरा तोंडवळा (चेहरा) सर्वांनाच ठाऊक आहे ! – संपादक)

२. आता भारताकडून याविषयीची कागदपत्रे मिळाली आहेत; परंतु त्यापूर्वीच भारताने कारवाई केली. तरीही आम्ही भारताची २ लढाऊ विमाने पाडली. (खोट्यावर खोटे बोलणारे पाकचे पंतप्रधान ! असे बोलून इम्रान खान यांनी स्वतःच्या देशालाच हास्यास्पद ठरवले आहे. २७ फेब्रुवारीला सकाळी इम्रान खान यांनी भारताची २ विमाने पाडल्याचे म्हटले होते. नंतर सायंकाळी त्यांच्या सैन्याने अधिकृतपणे १ विमान पाडल्याचे आणि एका भारतीय वैमानिकाला कह्यात घेतल्याचे घोषित केले होते. तरीही  खान असे विधान करत आहेत. यातून जग त्यांच्यावर कधीतरी विश्‍वास ठेवील का ? – संपादक) भारताने आताही काही कारवाई केली, तर आम्हाला प्रत्युत्तर द्यावेच लागेल. (‘सुंभ जळाला, तरी पिळ कायम !’, अशा मनोवृत्तीचा पाक आणि त्याचे पंतप्रधान ! – संपादक)

३. ९/११ च्या आक्रमणापूर्वी जगात सर्वाधिक आत्मघाती आक्रमणे ‘लिट्टे’ करत होती. त्यात हिंदूच सहभागी होते. (लिट्टे जशी संपली, तसेच पाकमधील आतंकवादी आणि त्यांना पोसणारी आयएस्आयही नष्ट होईल, हे इम्रान खान यांनी लक्षात ठेवावे ! – संपादक)

४. भारत आणि पाक यांच्यातील तणाव दूर करण्यासाठी आम्ही करतारपूर महामार्ग उघडण्याचा निर्णय घेतला. आम्ही तणाव न्यून करण्याचा प्रयत्न करत आहोत, त्याला कोणी आमचे दौर्बाल्य समजू नये. (पाकमध्ये किती शक्ती आहे, हे त्यालाही ठाऊक आहे. तरीही इम्रान खान उसने अवसान आणून अशी विधाने करत आहेत ! – संपादक)

५. बहादुर शाह जफर आणि टिपू सुलतान हे २ मोठे नवाब होते. पारतंत्र्य आणि स्वातंत्र्य यांत जफर याने पारतंत्र्य स्वीकारले, तर टिपू सुलतानने स्वातंत्र्य स्वीकारले. मी सांगू इच्छितो की, या देशासाठी टिपू सुलतान आदर्श आहे. (टिपू सुलतान ज्या देशाचा आदर्श आहे, त्याला नष्ट करणे, हे हिंदूंचे कर्तव्यच आहे ! – संपादक)

अभिनंदन यांना काही झाल्यास कारवाई करू ! – भारताची पाकला चेतावणी

नवी देहली – विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना पाकिस्तानने तातडीने भारतात पाठवावे. अभिनंदन प्रकरणावरून कोणतीही देवाणघेवाण केली जाणार नाही. या प्रकरणामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड होईल आणि ‘चर्चेचा पत्ता आपल्या हातात आहे’ असे पाकिस्तानला वाटत असेल, तर ती त्याची चूक आहे. अभिनंदन यांना काही झाल्यास पाकच्या विरोधात कणखर कारवाई करण्यात येईल, अशी कठोर भूमिका भारताने घेतल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी ‘एएन्आय’ वृत्तसंस्थेला दुपारी दिली होती. ‘यानंतरच सायंकाळी पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अभिनंदन यांना उद्या सोडण्यात येणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे भारताच्या कठोर भूमिकेचा पाकवर योग्य परिणाम झाल्याचे दिसून आले.

(म्हणे) ‘चर्चा केल्यास भारतीय वैमानिकाला सोडण्याचा विचार करू !’ – पाक

तणावाचे वातावरण न्यून होणार असेल, तर आम्ही अभिनंदन यांच्या सुटकेसाठी चर्चेस सिद्ध आहोत, असे पाकचे परराष्ट्रमंत्री शाह महंमद कुरैशी यांनी दुपारी म्हटले होते. त्यांच्या या विधानानंतरच भारताने वरील भूमिका मांडली होती. (पाक प्रत्येक संधीचा लाभ उठवण्याचा प्रयत्न करतो. अशा देशाला कोणतीही दयामाया न दाखवता जन्माची अद्दल घडवणे आवश्यक ! – संपादक)

पाकने प्रथम आतंकवाद्यांच्या विरोधात कारवाई करावी ! – भारत

भारताने पुढे म्हटले होते की, दोन्ही देशांच्या पंतप्रधानांमधील कुठल्याही चर्चेपूर्वी पाकने आतंकवादाच्या विरोधात ठोस पावले उचलावीत. पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी आता यावर बोलायला हवे. हाच आमचा पाकिस्तान आणि आंतराराष्ट्रीय समुदाय यांना संदेश आहे.

परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, अभिनंदन प्रकरणावरून पाकिस्तान पुढे कोणत्याही पद्धतीने नमते घेण्याची भारताची सिद्धता नाही. पाकिस्तान सध्या कंदहार प्रकरणाप्रमाणे (डिसेंबर १९९९ मध्ये आतंकवाद्यांनी भारतीय विमानाचे अपहरण केले. प्रवाशांच्या सुखरूप सुटकेसाठी आतंकवादी मसूद अझहर याची सुटका करण्यात आली.) भारतावर दबाव बनवण्याच्या विचारात आहे. असे असले, तरी भारत विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांच्या सुटकेप्रकरणी कोणतीही चर्चा करण्यास सिद्ध नाही. त्यांची तातडीने सुटका करण्यात यावी, हीच भारताची भूमिका आहे.

पाककडून अभिनंदन यांना वाईट वागणूक ! – संरक्षण मंत्रालय

पाककडून करण्यात आलेल्या हवाई आक्रमणात भारताच्या सैन्य तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याचसमवेत पाक सैन्याने जिनिव्हा कराराचे उल्लंघन करतांना भारतीय वायूदलाचे वैमानिक विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना वाईट वागणूक दिली आहे, असे भारतीय संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. ‘पाक सैन्य जैश-ए-महंमदला पाठिंबा देत आहे. मसूद अझहरला पाक त्याच्या देशात आश्रय देत आहे, असा आमचा ठाम विश्‍वास आहे’, असेही संरक्षण खात्याच्या अधिकार्‍यांनी म्हटले आहे.

जिनेव्हा परिषदेनुसार युद्धबंदींना सोडण्याचा नियम

वर्ष १९४९ च्या जिनेव्हा परिषदेत युद्धातील सैनिकी कैद्यांना देण्यात येणार्‍या वागणुकीविषयी एक मार्गदर्शिका करण्यात आली आहे. यात भारतीय आणि पाकिस्तानी सैन्य, तसेच सीमा सुरक्षा दल आणि पाकिस्तानी रेंजर्स यांच्यात एक अनौपचारिक सामंजस्य आहे. प्रतिवर्षी अशा सीमारेषा ओलांडण्याच्या घटना घडतात. अशा वेळी त्या सैनिकाची किंवा कर्मचार्‍याची ओळख पटली की, काही घंट्यांत किंवा काही दिवसांत त्यांना परत पाठवले जाते. संबंधित व्यक्तीची वैद्यकीय तपासणी करून त्याला हस्तांतरित केले जाते. वैमानिकांच्या सुटकेसंदर्भात मात्र जिनेव्हा परिषदेने कोणतीही वेळ निश्‍चित केलेली नाही. वर्ष १९९९ मध्ये जेव्हा भारतीय वायूसेनेचे वैमानिक के. नचिकेत यांना पाकने पकडले होते, त्या वेळी पाकने नचिकेत यांना ८ दिवसानंतर सोडून दिले होते.

या परिषदेच्या कलम ३ नुसार

१. घायाळ सैनिकांची योग्य काळजी घेणे

२. युद्धबंदींना योग्य जेवण, पाणी आणि अन्य सेवा पुरवणे

३. कोणत्याही युद्धबंदीशी अमानवी वर्तन करू नये

४. युद्धीबंदीला धमकावणे आणि घाबवरणे यांसारखे प्रकार करू नयेत

५. युद्धबंदीला धर्म, जात, जन्म आदी विचारता येत नाही


Multi Language |Offline reading | PDF