भारत आणि पाक यांच्यातील संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर लवकरच ‘शुभवार्ता’ समजेल ! – डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन – भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर एक शुभवार्ता समजेल. दोन्ही देशांतील तणाव वाढत आहे आणि तो अल्प करण्याच्या प्रक्रियेमध्ये अमेरिकाही सहभागी आहे. हा तणाव लवकरच निवळेल, असे दिसत आहे. ही नक्कीच चांगली बातमी आहे. मला आशा आहे की, दशकांपासून चालत असलेला हा तणाव लवकरच समाप्त होईल, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले.


Multi Language |Offline reading | PDF