धर्मांतरबंदी कायदा करण्याच्या विषयात लक्ष घालतो !  डॉ. रणजीत पाटील, गृहराज्यमंत्री

हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने घेतली विधानभवनात भेट

१. श्री. सतीश सोनार, २. डॉ. रणजीत पाटील ३. श्री. अरविंद पानसरे

मुंबई, २८ फेब्रुवारी (वार्ता.) – धर्मांतरबंदी कायदा करण्याच्या विषयात लक्ष घालतो. याविषयी मुख्यमंत्र्यांशी बोलतो, असे आश्‍वासन राज्याचे गृहराज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजीत पाटील यांनी दिले. धर्मांतरबंदी कायदा करण्यासाठी नुकतीच हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने त्यांची विधानभवनात भेट घेतली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे मुंबई येथील कार्यकर्ते श्री. सतीश सोनार, ठाणे येथील कार्यकर्ते श्री. अजय संभूस आणि समितीचे राज्य प्रवक्ते श्री. अरविंद पानसरे उपस्थित होते.

गृहराज्यमंत्र्यांना निवेदन देतांना श्री. पानसरे म्हणाले, ‘‘आज मुंबईजवळ असलेल्या ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथे एक लाखांहून अधिक सिंधी बांधवांचे धर्मांतर झाले आहे. यात केवळ गरीबच नव्हे, तर श्रीमंत लोकांचाही समावेश आहे. प्रार्थना सभेच्या नावाखाली ‘असाध्य रोग बरा करू’, ‘नोकरी लावू’, ‘घरातील पिडा दूर करू’, अशी अनेक आमीषे आणि प्रलोभने दाखवून हे धर्मांतर केले जात आहे. या विरोधात तत्कालीन काँग्रेस शासनाने निवृत्त न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी समिती नेमली होती. त्या समितीने ओडिशा आणि मध्यप्रदेश राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रात धर्मांतरबंदी कायदा करण्याची शिफारस वर्ष २०१४ मध्ये शासनाला केली होती; मात्र त्याची कार्यवाही केली जात नाही.’’

यावर गृहराज्यमंत्री डॉ. पाटील यांनी विचारले, ‘‘हा कायदा करण्याचा अधिकार केंद्रशासनाचा आहे ना ?’’, त्यावर त्यांना श्री. पानसरे यांनी सांगितले, ‘‘अशा प्रकारचा कायदा देशातील ८ राज्यांनी केला आहे. त्यात ओडिशा, मध्यप्रदेश, राज्यस्थान, गुजरात, उत्तराखंड, तमिळनाडू, हिमाचलप्रदेश आणि झारखंड यांचा समावेश आहे. ‘धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर’ असल्याचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सांगून ठेवलेले आहे; मात्र आजपर्यंत राज्यकर्त्यांनी त्याकडे लक्ष न दिल्यामुळे देशातील ईशान्येकडील सात आणि अन्य एका राज्यांत हिंदू अल्पसंख्यांक झाले आहेत. तेथील ख्रिस्ती आणि मुसलमान पंथांचे लोक स्वतंत्र राष्ट्राची मागणी करत आहेत.’’

सनातन संस्था चांगले कार्य करत असून सहकार्य करण्याचे डॉ. पाटील यांचे आश्‍वासन

गृहराज्यमंत्री डॉ. पाटील म्हणाले, ‘‘मी तुम्हाला नेहमी पहातो. तुम्ही (सनातन संस्थेचे लोक) चांगले कार्य करत आहात. तुमच्याकडे इतरही काही चांगले विषय असतील, तर घेऊन या. मी तुम्हाला नक्की सहकार्य करीन.’’

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now