रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमात संतांची भेट झाल्यानंतर भावविश्‍वात रमलेला ५७ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कु. मयंक संजय सिप्पी (वय ८ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. मयंक संजय सिप्पी हा एक आहे !

कु. मयंक सिप्पी

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

 (‘वर्ष २०१७ मध्ये कु. मयंक याची ५३ टक्के आध्यात्मिक पातळी होती.’ – संकलक)

‘२५.९.२०१८ या दिवशी आम्ही रामनाथी (गोवा) येथील आश्रमात आलो होतो. त्या वेळी आमची एका संतांशी भेट झाली.

१. संत खोलीत आल्यावर माझा मुलगा कु. मयंक याला सुगंध आला आणि पिवळा प्रकाश दिसला. तेव्हापासून तो म्हणतो, ‘‘संत किती छान आहेत ! ते ग्रंथ आणि दैनिक यांत दिसतात, तसेच आहेत. मला इथेच रहावेसे वाटते.’’

२. ‘संतांनी मला स्पर्श केल्यापासून माझे गाल पुष्कळ मऊ वाटतात आणि मला ऊर्जा मिळाल्यासारखे वाटत आहे. त्यांच्या हातावर किती पांढरा प्रकाश आहे आणि त्यांची त्वचाही किती पांढरी आहे !’, असे तो म्हणतो.

३. ‘संत पुष्कळच छान आहेत ना ? म्हणूनच सर्व जण संतांकडे येतात ना ? बाबा, तुम्ही मला संतांकडे उशिरा का आणलेत ?’, असे प्रश्‍न तो विचारतो.

४. मयंक म्हणतो, ‘‘आश्रमात सर्व जण किती छान रहातात ! मलाही आश्रमात पुष्कळ छान वाटत आहे. बाबा, आपण इथेच रहायला येऊ ना ?’’

५. संतांची भेट झाल्यावर मयंक खोलीत आला. त्या वेळी त्याने काही चित्रे न पहाता आठवून आणि विचार करून काढली.

६. संतांच्या भेटीनंतर दुसर्‍या दिवसापासून, म्हणजे २६.९.२०१८ पासून कु. मयंकचा ‘बनियन’ फिकट गुलाबी रंगाचा झाला आहे.’

– श्री. संजय सिप्पी (वडील), यवतमाळ (२८.९.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF