नाशिक, जळगाव आणि धुळे येथील आधुनिक वैद्य अन् वैद्यकीय व्यावसायिक यांची १८० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जप्त

  • आयकर विभागाची कारवाई !

  • वैद्यकीय व्यवसायाला काळीमा फासणारा प्रकार !

नाशिक – आयकर विभागाने उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव आणि धुळे येथील आधुनिक वैद्य अन् वैद्यकीय व्यवसाय करणार्‍यांवर टाकलेल्या धाडीत मोठ्या प्रमाणात बेहिशेबी मालमत्ता जप्त केली आहे. एकूण २० व्यक्तींच्या ४० मालमत्तांच्या ठिकाणी आयकराने तपासणीसत्र राबवले. एका कृषी प्रक्रिया उद्योगाचीही झडती घेण्यात आली. या कारवाईत एकूण १८० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्यात आली. नोटाबंदीनंतर आयकर विभागाने टाकलेले हे धाडसत्र उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत मोठे धाडसत्र होते.

एक आधुनिक वैद्य किंवा व्यावसायिक दुसरा व्यावसायिक किंवा आधुनिक वैद्य यांचा संदर्भ रुग्णाला देऊन त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात ‘कमिशन’ उकळत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. बेहिशेबी मालमत्तेमागे ही ‘कटप्रॅक्टिस’ असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.


Multi Language |Offline reading | PDF