भारताच्या कारवाईमुळे पाककडून भारतीय चित्रपटांवर बंदी

भारत पाकचे कलाकार आणि त्याच्या वाहिन्यांचे प्रसारण यांवर बंदी कधी घालणार ?

इस्लामाबाद – भारताने केलेल्या कारवाईनंतर पाकने आणखी काही करता येत नाही; म्हणून भारतीय चित्रपटांवर बंदी घातली आहे. यामुळे भारताचा कुठलाही चित्रपट आता पाकमध्ये प्रदर्शित होणार नाही, असे पाकचे माहिती आणि प्रसारण मंत्री चौधरी फवाद हुसैन यांनी घोषित केले आहे. पाकमधील ‘सिनेमा एक्झीबिटर असोसिएशन’ने भारतीय चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ‘पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी’ने भारतातील विज्ञापने प्रसारित न करण्याचा निर्णय घोषित केला आहे. असे असले, तरी पुलवामा येथील आक्रमणानंतर भारतीय चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि निर्माते यांनी याआधी पाकमध्ये भारतीय चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे.


Multi Language |Offline reading | PDF