राज्यात धर्मांतरबंदी कायदा लागू व्हावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांना निवेदन

सरकारने लवकरात लवकर स्वतःहून धर्मांतरबंदी कायदा करावा, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !

डावीकडून श्री. अजय संभूस, निवेदन स्वीकारतांना आमदार श्री. हेमंत पाटील आणि श्री. सतीश सोनार

मुंबई, २७ फेब्रुवारी (वार्ता.) – न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी समितीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रात तात्काळ ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करण्यात यावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिवसेनेचे नांदेड येथील आमदार हेमंत पाटील यांना निवेदन देण्यात आले. विधीमंडळात चालू असलेल्या अर्थसंकल्प अधिवेशनात हा कायदा होण्यासाठी मागणी करावी, असे आवाहन समितीच्या वतीने श्री. सतीश सोनार आणि श्री. अजय संभूस यांनी केले.

या निवेदनामध्ये म्हटले आहे की,

१. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहरात ५-६ वर्षांत ख्रिस्ती मिशनर्‍यांनी येथील दीड लाखाहून अधिक सिंधी समाजातील लोकांचे धर्मार्ंतर केले आहे. धर्मांतराचे हे प्रकार असेच चालू राहिले, तर येथील सिंधी समाज नामशेष होण्याची भीती आहे.

२. उल्हासनगर शहर आणि आजूबाजूच्या परिसरात भव्य १७ चर्च उभारण्यात आली आहेत. या ठिकाणी ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून प्रार्थनेच्या नावाखाली हिंदु समाजातील विविध घटकांचे धर्मांतर करण्यात येत आहे.

३. पनवेल शहरामध्येही धर्मांतराचे असेच प्रकार चालू आहेत. या परिसरातील रुग्णालयात जाऊन पाद्री आणि नन हे रुग्णांसाठी प्रार्थना करण्याच्या नावाखाली धर्मांतराचे जाळे पसरवतात.

४. धर्मांतरामुळे देशातील ८ राज्यांत हिंदू अल्पसंख्य झाल्याने तेथील हिंदूंना जगणेही कठीण झाले आहे. एकूणच आमीष, प्रलोभने आणि बळजबरीने चालणारे हे धर्मांतराचे प्रकार संविधानाच्या विरोधात तर आहेतच, तसेच मानवतेलाही काळीमा फासणारे आहेत. हे एक मोठे राष्ट्रविरोधी षड्यंत्र आहे. तरी या गंभीर समस्येची शासनाने तात्काळ नोंद घ्यावी आणि देशाला गिळणार्‍या धर्मांतररूपी अजगराचा योग्य पद्धतीने बंदोबस्त करावा.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now