महर्षि भृगु यांच्या आज्ञेनुसार सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या शुभहस्ते सनातनच्या रामनाथी आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंच्या सिमेंटच्या चौथर्‍यांवर पांढर्‍या रंगाच्या हत्तींच्या मूर्तींची स्थापना करतांना केलेले सूक्ष्म परीक्षण !

कु. मधुरा भोसले

महर्षि भृगु यांच्या आज्ञेवरून सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या शुभहस्ते १५.१.२०१९ या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंच्या सिमेंटच्या चौथर्‍यांवर पांढर्‍या रंगाच्या हत्तींच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली. ‘या हत्तींच्या मूर्तींच्या ठिकाणी ऐरावत आहे’, या भावाने त्यांचे आदल्या दिवशी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या शुभहस्ते भावपूर्ण पूजन करण्यात आले होते. आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंच्या चौथर्‍यांवर पांढर्‍या रंगाच्या हत्तींच्या मूर्तींची स्थापना करतांंना देवाच्या कृपेने माझ्याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.

१. दोन्ही हत्तींच्या मूर्ती सुंदर आणि भावपूर्ण रंगवल्यामुळे त्यांच्याकडे ईश्‍वरी चैतन्य अधिक प्रमाणात आकृष्ट होणे

सनातनचे साधक श्री. रामानंद परब यांनी हत्तींच्या मूर्ती अतिशय सुंदर आणि भावपूर्ण रंगवल्या होत्या. त्यामुळे त्यांच्याकडे अधिक प्रमाणात ईश्‍वरी चैतन्य आकृष्ट होत होते. हत्तींचे डोळे बोलके दिसत होते. त्यांच्या डोळ्यांतून ईश्‍वराप्रतीचा कृतज्ञताभाव, समर्पितभाव, आर्तभाव आणि शरणागतभाव व्यक्त होत होता.

२. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी दोन्ही हत्तींच्या मूर्तींचे पूजन करतांना त्यांच्यावर गंध, अक्षता आणि फुले वाहिल्यामुळे दोन्ही हत्तींच्या मूर्तींचे प्रथम सहस्रारचक्र अन् त्यानंतर आज्ञाचक्र जागृत होणे

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी दोन्ही हत्तींच्या मूर्तींचे पूजन करतांना त्यांच्यावर गंध, अक्षता आणि फुले वाहिली. त्यामुळे दोन्ही हत्तींच्या मूर्तींचे प्रथम सहस्रारचक्र आणि त्यानंतर आज्ञाचक्र जागृत झाले. अशाप्रकारे त्यांची सुषुम्नानाडी चालू झाल्यामुळे त्यांना उच्च देवतांकडून प्रक्षेपित होणारी शक्ती आणि चैतन्य यांच्या लहरी सहजतेने ग्रहण करता आल्या अन् दोन्ही हत्तींच्या मूर्तींची त्या लहरी प्रक्षेपित करण्याची क्षमताही वाढली.

३. हत्तींच्या मूर्तींचे पूजन केल्यामुळे त्यांमध्ये ५ टक्के इतक्या प्रमाणात ऐरावताचे तत्त्व कार्यरत होणे

हत्तींच्या मूर्तींचे पूजन करण्यापूर्वी त्यांमध्ये १ टक्का आणि पूजनानंतर ५ टक्के इतक्या प्रमाणात ऐरावताचे तत्त्व कार्यरत झाले.

४. हत्तींच्या मूर्तींच्या विविध अवयवांतून ईश्‍वरी शक्ती आणि चैतन्य दशदिशांमध्ये प्रक्षेपित होणे

हत्तींच्या मूर्तींनी ग्रहण केलेली ईश्‍वरी शक्ती आणि चैतन्य यांच्या लहरी त्यांच्या विविध अवयवांतून कार्यरत झाल्या अन् त्या दशदिशांमध्ये प्रक्षेपित झाल्या.

५. हत्तींच्या मूर्तींचे पाय, शेपूट आणि सोंड यांच्या माध्यमातून होणारे सूक्ष्मातील कार्य

१. कार्यरत पंचतत्त्व २. कार्यरत तत्त्व ३. संबंधित लोक ४. हत्तींच्या मूर्तींची स्थापना केल्यामुळे झालेला सूक्ष्म परिणाम ५. हत्तींच्या मूर्तींकडे पाहिल्यावर येणारी अनुभूती

६. गजमूर्तींचे पूजन चालू असतांना सद्गुरु बिंदाताईंवर स्थुलातून सूर्यकिरण पडून त्यांचे अनाहतचक्र पिवळसर रंगाचे दिसणे, भाव आणि सगुण चैतन्य यांच्या स्तरांवर गजपूजन अन् गजस्थापना केल्यामुळे दोन्ही हत्तींमध्ये विपुल प्रमाणात ऐरावताची शक्ती आणि ईश्‍वराचे सगुण चैतन्य कार्यरत होणे

गजमूर्तींचेे पूजन करतांना सद्गुरु बिंदाताईंच्या अनाहतचक्राच्या ठिकाणी स्थुलातून सूर्यकिरण पडून त्यांचे अनाहतचक्र पिवळसर रंगाचे दिसत होते आणि त्यांच्या अनाहतचक्रातून वातावरणात पिवळसर रंगाचे प्रकाशकिरण प्रक्षेपित होतांना दिसले. ‘सद्गुरु बिंदाताईंकडेे उच्च लोकातील सगुण चैतन्य आकृष्ट होत आहे’, असे मला जाणवले. त्यांनी भाव आणि सगुण चैतन्य यांच्या स्तरांवर गजमूर्तींचे पूजन अन् गजमूर्तींची स्थापना केल्यामुळे हत्तींच्या दोन्ही मूर्तींमध्ये विपुल प्रमाणात इंद्रदेवाचे वाहन असलेल्या ऐरावताची शक्ती आणि ईश्‍वराचे सगुण चैतन्य कार्यरत झाले.

७. गजमूर्तींचे पूजन चालू असतांना सद्गुरु बिंदाताईंवर सूक्ष्मातून पांढर्‍या रंगाचा प्रकाशझोत पडलेला दिसणे आणि दोन्ही हत्तींमध्ये विपुल प्रमाणात ईश्‍वरी चैतन्य कार्यरत होऊन हत्तींभोवती चैतन्याची पिवळसर पांढर्‍या रंगाची आभा निर्माण होणे

गजमूर्तींचे पूजन करतांना सद्गुरु बिंदाताईंवर सूक्ष्मातून पांढर्‍या रंगाचा प्रकाशझोत पडलेला दिसत होता. ‘त्यांच्याकडे उच्च लोकातील निर्गुण चैतन्य आकृष्ट होत आहे’, असे मला जाणवले. त्यांनी चैतन्याच्या स्तरावर गजमूर्तींचे पूजन आणि गजमूर्तींची स्थापना केल्यामुळे हत्तींच्या दोन्ही मूर्तींमध्ये विपुल प्रमाणात ईश्‍वरी चैतन्य कार्यरत झाले अन् हत्तींच्या मूर्तींच्या भोवती चैतन्याची पिवळसर पांढर्‍या रंगाची आभा निर्माण झाली.

८. गजमूर्तींचे पूजन चालू असतांना स्वर्गलोकातील विविध देवता पूजनाच्या ठिकाणी सूक्ष्मातून उपस्थित असल्याचे जाणवणे आणि सद्गुरु बिंदाताईंनी ‘गजपूजन आणि गजस्थापना’, हे दोन्ही विधी अत्यंत भावपूर्णरित्या केल्यामुळे देवतांनी साधकांवर प्रसन्न होऊन त्यांना भरभरून कृपाशीर्वाद देणे

‘गजमूर्तींचे पूजन चालू असतांना स्वर्गलोकातील विविध देवता पूजनाच्या ठिकाणी सूक्ष्मातून उपस्थित आहेत’, असे मला जाणवले. तेव्हा आश्रमाच्या वायूमंडलात ‘लाल, गुलाबी, केशरी, निळ्या, पोपटी, करड्या आणि राखाडी’ या रंगांच्या प्रभावळी कार्यरत झाल्याचे जाणवले. त्यामुळे आश्रमातील वातावरण चांगली शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती यांनी भारित झाले. सद्गुरु बिंदाताईंनी ‘गजमूर्तींचे पूजन आणि गजमूर्तींची स्थापना’, हे दोन्ही विधी अत्यंत भावपूर्णरित्या केल्यामुळे स्वर्गलोकातील देवतांनी साधकांवर प्रसन्न होऊन त्यांना भरभरून कृपाशीर्वाद दिले.

९. गजमूर्तींच्या स्थापनेमुळे आश्रमाभोवती पांढर्‍या रंगाच्या गजबळाचे अभेद्य संरक्षककवच निर्माण होणे

आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ऐरावताचे प्रतिरूप असणार्‍या हत्तींच्या लघुरूपाच्या मूर्तींची स्थुलातून स्थापना झाल्यामुळे आश्रमाभोवती पांढर्‍या रंगाच्या गजबळाचे अभेद्य संरक्षककवच निर्माण झाले.

१०. दोन्ही हत्तींच्या मूर्तींच्या पाठीवर सूक्ष्मातून इंद्राची स्थापना केल्यावर झालेली सूक्ष्म प्रक्रिया

दोन्ही हत्तींच्या मूर्तींच्या पाठीवर सूक्ष्मातून इंद्राची स्थापना केल्यावर दोन्ही हत्तींवर इंद्राचे वर्चस्व प्रस्थापित झाले आणि सूक्ष्मातून वज्रधारी इंद्राचे लघु अन् सूक्ष्म रूप दोन्ही हत्तींच्या मूर्तींवर आरूढ झालेले दिसले. आश्रमातील प्रवेशद्वारावरील हत्तींच्या मूर्तींची सर्व इंद्रिये, मन आणि बुद्धी यांवर इंद्राचे अधिपत्य स्थापित झाल्यामुळे हत्तींना स्वर्गलोकातील ऐरावताचे स्वरूप प्राप्त झाले.

११. दोन्ही हत्तींच्या मूर्तींवर परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचा दृष्टीक्षेप पडल्यावर त्यांच्या दृष्टीतून पांढर्‍या रंगाचा प्रकाशझोत दोन्ही हत्तींच्या मूर्तींच्या दिशेने जाणे आणि दोन्ही हत्तींच्या मूर्तींमध्ये प्राणप्रतिष्ठा होणे

गजमूर्तींचे पूजन आणि गजमूर्तींची स्थापना चालू असतांना परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी स्थापन केलेल्या हत्तींकडे पाहिले. तेव्हा त्यांच्या दृष्टीतून पांढर्‍या रंगाचा प्रकाशझोत हत्तींच्या मूर्तींच्या दिशेने गेला आणि हत्तींच्या मूर्तींमध्ये प्राणप्रतिष्ठा झाल्याचे जाणवले. त्यामुळे हत्तींच्या मूर्तींची सूक्ष्मातून हालचाल चालू झाली.

 १२. सद्गुरु बिंदाताईंनी परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी दिलेल्या अक्षता दोन्ही हत्तींच्या मूर्तींवर वाहिल्यावर अक्षतांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांची शक्ती आणि चैतन्य दोन्ही हत्तींच्या मूर्तींमध्ये संक्रमित होणे

सद्गुरु बिंदाताईंनी परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी दिलेल्या अक्षता हत्तींच्या मूर्तींवर वाहिल्यावर अक्षतांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांची शक्ती आणि चैतन्य हत्तींच्या मूर्तींमध्ये संक्रमित झाले अन् त्यांना सूक्ष्मातून कार्य करण्यासाठी बळ प्राप्त झाले. दोन्ही हत्तींच्या मूर्तींना पुष्कळ आनंद होऊन त्यांनी आनंदाने सूक्ष्मातून शेपटी हलवली आणि सोंड वर करून चित्कार केला. तेव्हा त्यांच्या सोंडेतून गुलाबी रंगाचे आनंदाचे तुषार वातावरणात पसरून संपूर्ण वातावरण आनंददायी झाले आणि वातावरणातील त्रासदायक काळी शक्ती सोंडेकडे आकृष्ट होऊन सोंडेतील पोकळीमध्ये कार्यरत असणार्‍या आकाशतत्त्वाच्या प्रभावामुळे ती नष्ट झाली.

 १३. प्रवेशद्वाराच्या डावीकडील आणि उजवीकडील हत्तींच्या मूर्तींची वैशिष्ट्ये

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.१.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF