परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या सोहळ्याच्या वेळी ऑस्ट्रिया येथील कु. पेट्रा स्टिच यांना झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘कृष्ण आणि राम यांची वेशभूषा केल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आलेली अनुभूती

महर्षींनी सप्तर्षि जीवनाडीत सांगितले म्हणून मी कृष्ण आणि राम यांची अनुक्रमे १८ आणि १९.५.२०१७ या दिवशी वेशभूषा केली. तेव्हा काही साधकांना अनुभूती आल्या. काहींनी सूक्ष्म-परीक्षण केले आणि वैज्ञानिक उपकरणांद्वारे संशोधनही केले. त्या वेळी मला स्वतःला काहीच वाटले नाही किंवा जाणवले नाही; कारण संपूर्ण कार्यक्रमाच्या वेळी मी साक्षीभावात होतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

कु. पेट्रा स्टिच

१. अमृत महोत्सवाच्या सोहळ्याचा पहिला दिवस (१८.५.२०१७)

१ अ. अमृत महोत्सव सोहळ्याच्या पूर्वी ‘श्रीकृष्णाचे दर्शन व्हावे’, अशी तीव्र इच्छा निर्माण होणे आणि अमृत महोत्सव सोहळ्याच्या पहिल्या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्रीकृष्णाचा वेश परिधान करून त्या इच्छेची पूर्तता केल्याचे जाणवणे : ‘१८.५.२०१७ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सव सोहळ्याचा पहिला दिवस होता. त्या वेळी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्रीकृष्णाचा वेश परिधान करून साधकांची श्रीकृष्णाचे दर्शन मिळण्याची इच्छा पूर्ण केली आहे’, हे पहाताक्षणी मला पुष्कळ आश्‍चर्य वाटले; कारण मागचा एक प्रसंग मला आठवला. १३.५.२०१७ या दिवशी भाववृद्धी सत्संगात माझ्या मनात ‘श्रीकृष्णाचे दर्शन व्हावे’, अशी तीव्र इच्छा निर्माण झाली. ‘तुझे दर्शन मिळू दे’, अशी प्रार्थना मी श्रीकृष्णाला करत होते. ‘माझ्या मनात अशी इच्छा कशी निर्माण झाली ?’, याचे माझे मलाच आश्‍चर्य वाटत होते; कारण एरव्ही मी ‘दर्शन होणे वा न होणे’, याला विशेष महत्त्व देत नाही. त्यामुळे ही प्रार्थना मी नंतर लगेच विसरूनही गेले. अमृत महोत्सवाचा कार्यक्रम पहातांना मला जाणीव झाली, ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्या मनात इच्छा निर्माण केली आणि तिची पूर्तीही केली.’ ज्याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती, असे श्रीकृष्णाच्या रूपातील दर्शन त्यांनी मला या कार्यक्रमात दिले. त्यामुळे मला गुरुदेवांच्या महानतेची पुन्हा निश्‍चिती पटली.

१ आ. या संपूर्ण कार्यक्रमात मी भाव आणि आनंद यांच्या स्थितीत होते. ही स्थिती पुढे कित्येक घंटे टिकून होती.

१ इ. कार्यक्रम झाल्यानंतर झालेले त्रास

१. कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी माझा आध्यात्मिक त्रास वाढल्याचे माझ्या लक्षात आले. मागे मी रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात काही दिवस राहून घरी परत जातांना ‘आपण कुठेतरी खोल जाऊन पडत आहोत’, असे मला वाटत होते. त्या दिवशी संध्याकाळी मला अशीच अनुभूती आली.

२. त्या वेळी माझ्या मनातील नकारात्मक विचार वाढले आणि मला निराशा आली, तसेच ‘साधना करू नये’, असे वाटत होते.

२. अमृत महोत्सवाच्या सोहळ्याचा दुसरा दिवस (१९.५.२०१७)

२ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे श्रीरामाच्या वेशात आगमन झाल्यावर भाव जागृत होणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्रीती अन् महानता आठवून मन प्रेमाने भरून येणे : कार्यक्रमस्थळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे श्रीरामाच्या वेशात आगमन झाल्यावर माझा भाव जागृत झाला. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्रीती, महानता आणि जगातील इतक्या लोकांमधून त्यांनी माझी निवड केली आणि ते मला गुरु म्हणून लाभले’, हे सर्व आठवून माझे मन प्रेमाने भरून आले. हे व्यक्त करायला मला शब्द सुचत नाहीत.

२ आ. नाडीपट्टी वाचनाच्या वेळी डोके पुष्कळ दुखू लागणे आणि नामजपादी उपाय केल्यावर आध्यात्मिक त्रास सहन करून पुढील कार्यक्रम एकाग्रतेने पहाता येणे : कार्यक्रमातील नाडीपट्टी वाचनाच्या वेळी माझे डोके पुष्कळ दुखू लागले. काही वेळा ‘मला त्रास देणार्‍या मोठ्या वाईट शक्तीचा त्रास वाढत होता’, असेही मला जाणवत होते. आज्ञाचक्रावर मुद्रा केल्यावर आणि प्रार्थना अन् एकाग्रतेने नामजप केल्यावर मला हा त्रास सहन करून पुढील कार्यक्रम एकाग्रतेने पहाता आला.

२ इ. नाडीपट्टी वाचनात ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी प्रत्येक साधकाच्या या जन्माचे आधीच नियोजन करून ठेवले आहे’, असे सांगण्यात आल्यावर भावजागृती होणे आणि सकारात्मकता निर्माण होऊन मनातील विकल्प नाहीसे होणे : नाडीपट्टी वाचनात ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी प्रत्येक साधकाच्या या जन्माचे आधीच नियोजन करून ठेवले आहे’, असे सांगण्यात आले. ते ऐकून माझी भावजागृती झाली आणि मला वाटले, ‘या क्षणी वर्तमानातील प्रत्येक परिस्थिती स्वीकारण्यास मी सिद्ध आहे, तसेच भविष्यातही परात्पर गुरुदेव माझ्यासाठी जे काही प्रसंग निर्माण करतील, त्यातून मला आनंदच मिळणार आहे.’ या विचारांमुळे ‘सूर्यप्रकाशात बर्फ वितळावा’, तसे माझ्या मनातील विकल्प नाहीसे झाले. त्या वेळी माझ्या मनात उरली केवळ कृतज्ञता आणि श्रद्धा !

२ ई. या कार्यक्रमातून ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीविष्णूचा ११ वा अवतार आहेत’, असे जाणवणे आणि ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मनातील सगळ्या शंका अन् विकल्प दूर होणे’ : या मंगलमय प्रसंगी शिकायला मिळालेली सूत्रे आणि अनुभूती व्यक्त करण्यास मला शब्द अपुरे पडत आहेत. या संपूर्ण कार्यक्रमातील प्रत्येक प्रसंग आणि वाक्य अभूतपूर्व होते. यातून ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे श्रीविष्णूचा ११ वा अवतार आहेत’, असे मला जाणवले; मात्र ‘याचा नेमका अर्थ काय ?’, हे मला समजलेले नाही. मला केवळ इतकेच समजलेे की, ते सर्वशक्तीमान परमेश्‍वराचा अवतार आहेत. वास्तविक पहिल्यांदा त्यांचे छायाचित्र पाहिल्यावरच मला याची जाणीव झाली होती; मात्र माझा स्वतःच्या विचारांवर विश्‍वास नव्हता. केवळ अन् केवळ त्यांच्या कृपेनेच माझ्या मनातील सगळ्या शंका आणि विकल्प दूर झाले आहेत. ही परात्पर गुरु डॉक्टरांच्या महानतेची एक प्रचीती आहे.

२ उ. हा कार्यक्रम संपल्यावर दोन घंट्यांनी मला होणारा आध्यात्मिक त्रासही हळूहळू उणावला.

३. २०.५.२०१७ या दिवशीच्या भाववृद्धी सत्संगानंतर माझे मन पुन्हा स्थिर झाले आणि माझी साधना करण्याची तळमळ वाढली. यानंतर माझे सगळे शारीरिक आणि मानसिक त्रास नाहीसे झाले.

‘हे श्रीकृष्णा, प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले, मी या अनुभूती आपल्या तेजस्वी चरणकमलांवर विनम्रपणे अर्पण करते. ‘आपण सर्व साधकांना याच जन्मात मोक्षापर्यंत घेऊन जाणार आहात’, अशी श्रद्धा माझ्या मनात निर्माण झाली आहे. ’

– कु. पेट्रा स्टिच, ऑस्ट्रिया (२१.५.२०१७)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक 


Multi Language |Offline reading | PDF