संत भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज यांच्या पादुकांचे दर्शन घेतांना आलेल्या अनुभूती

पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ

१. साधकांसाठी पादुकांमधील चैतन्य तात्काळ कार्यरत होणे

‘संत भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज यांच्या पादुकांचे रामनाथी आश्रमात आगमन झाल्यावर लगेचच माझी सुषुम्ना नाडी कार्यरत झाली. ‘साधकांसाठी पादुकांमधील चैतन्य कसे तात्काळ कार्य करते’, याची अनुभूती मी घेतली.

२. आता काळानुसार गुरुतत्त्व ईश्‍वरी राज्याची, म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठी व्यापक स्तरावर कार्यरत झाले असल्याची अनुभूती येणे

पादुकांचे पूजन होत असतांना माझ्या मूलाधारचक्रापर्यंत पादुकांची स्पंदने पोहोचून माझी कुंडलिनीशक्ती जागृत झाली. त्या वेळी मला पाठीमध्ये थंडावा जाणवू लागला. त्यानंतर पादुकांची स्पंदने थेट सहस्रारचक्र भेदून वातावरणात जाऊ लागली. यावरून मला जाणवले, ‘आता गुरुपरंपरेच्या तत्त्वाचे कार्य व्यापक झाले आहे. पूर्वी ते साधकांची आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी मुख्यत्वे कार्यरत होते. आता साधकांची आध्यात्मिक उन्नती वेगाने होत असल्याने आता गुरुतत्त्व ईश्‍वरी राज्याची, म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठी व्यापक स्तरावर कार्यरत झाले आहे.’ काळानुसार गुरुतत्त्वाच्या कार्यामध्ये झालेला पालट मला लक्षात आला.

३. पादुकांना बघून मला पुष्कळ आनंद होत होता. एवढा आनंद मी पूर्वी कधी अनुभवला नव्हता.’

– (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.१२.२०१८)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक


Multi Language |Offline reading | PDF