चितगाव (बांगलादेश) येथे स्नान करत असलेल्या हिंदु महिलेचे चोरून चित्रीकरण करणार्‍या धर्मांधांकडून तिच्या पतीवर प्राणघातक आक्रमण

बांगलादेशातील हिंदूंची ही दयनीय स्थिती रोखण्यासाठी भारतात हिंदु राष्ट्र स्थापन करण्याला पर्याय नाही !

चितगाव (बांगलादेश) – येथील पिपलू शील या हिंदू व्यक्तीची पत्नी घरातील स्नानगृहात सकाळी ५.३० वाजता स्नान करत असतांना नुरुल आलम कालू नावाच्या धर्मांधाने त्यांच्या घरात चोरून प्रवेश केला आणि तो त्याच्या भ्रमणभाषवर त्या महिलेचे तिच्या नकळत चित्रीकरण करू लागला. ही गोष्ट शेजार्‍यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी कालू याला पकडले आणि त्याचा भ्रमणभाष हिरावून घेतला. त्यात या महिलेचा पती पिपलू शील याचाही सहभाग होता. त्याचा राग मनात धरून कालू याने त्याचे मित्र महंमद इमान आणि तौहीद अली यांच्या साहाय्याने पिपलू शील बाजारात जात असतांना त्याच्यावर धारदार शस्त्रांनी आक्रमण केले. पिपलू शील याला घायाळ अवस्थेत रुग्णालयात भरती करण्यात आले. या प्रकरणाची पोलीस चौकशी करत आहेत.


Multi Language |Offline reading | PDF