जैश-ए-महंमदचे मुख्य प्रशिक्षणकेंद्र नष्ट

 • भारतीय वायूदलाने पाकवर केलेल्या आक्रमणात ३०० हून अधिक आतंकवादी ठार

 • १ सहस्र किलो वजनाच्या बॉम्बचा मारा

 • ‘मिराज २०००’ वर्गातील १२ लढाऊ विमानांची २१ मिनिटांची कारवाई

 • मसूद अझहरचा भाऊ इब्राहिम अझहर आणि मेहुणा युसूफ अझहर ठार

  • भारतीय वायूदलाचे अभिनंदन ! वायूदलाच्या या क्षमतेचा आतापर्यंत वापर करून न घेतल्याने शेकडो सैनिकांना हुतात्मा व्हावे लागले, ही वस्तूस्थिती आहे !
  • एका ‘सर्जिकल स्ट्राईक’मुळे पाकपुरस्कृत आतंकवाद नष्ट झाला नाही आणि आताच्या वायूदलाच्या कारवाईनंतरही तो नष्ट होण्याची शक्यता नाहीच; कारण या आतंकवादाचे मूळ पाकिस्तान आणि त्याची जिहादी मानसिकता आहे. पाकला संपूर्ण नष्ट केल्याविना आतंकवाद नष्ट होणार नाही, हेच वास्तव आहे !
  • या कारवाईमुळे भारतीय आनंदात असले, तरी ही छोटीशीच कारवाई आहे. मुळासकट आतंकवाद नष्ट करण्यासाठी आता भाजप सरकारने कठोर पाऊल उचलले पाहिजे !
  • ‘भारताने पुलवामा आक्रमणाचा सूड घेतला’, असे म्हटले, तरी गेल्या ३ दशकांत झालेल्या आतंकवादी आक्रमणांचा असा सूड का घेण्यात आला नाही, त्यासाठी ४० सैनिकांच्या हौतात्म्याची वाट का पहावी लागली, याचे उत्तर काँग्रेस आणि भाजप या दोघांनीही दिले पाहिजे !

नवी देहली – पुलवामा येथील आतंकवादी आक्रमणात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या पोलिसांवर झालेल्या आक्रमणात ४० पोलीस हुतात्मा झाल्याचा सूड भारताने २६ फेब्रुवारीला उगवला. भारताच्या वायूदलाने पहाटे साडेतीन वाजता पाकच्या सीमेपासून ४० किमी आत असणार्‍या खैबर-पख्तुनवा प्रांतातील बालाकोटमधील जैश-ए-महंमदच्या प्रशिक्षणकेंद्रावर बॉम्ब टाकत संपूर्ण केंद्र उद्ध्वस्त केले. या कारवाईत प्रशिक्षण केंद्रामध्ये असणारे जैशचे आतंकवादी, त्यांना प्रशिक्षण देणारे आतंकवादी, कमांडर आदी  ३०० हून अधिक जण ठार झाल्याचे सांगितले जात आहे. यात जैशचा प्रमुख मसूद अझहरचा मोठा भाऊ इब्राहिम अझहर आणि मसूद याचा मेहुणा युसूफ अझहरसुद्धा यात ठार झाला आहे. तसेच येथील जैशचे मुख्य नियंत्रणकक्ष ‘अल्फा ३’ हेही यात उद्ध्वस्त झाले आहे. भारतीय वायूसेनेच्या ‘मिराज २०००’ वर्गातील १२ लढाऊ विमानांनी २१ मिनिटे ही कारवाई केली. या विमानांनी टाकलेले  बॉम्ब १ सहस्र किलो वजनाचे होते. भारतीय वायूदलाने पाकमध्ये घुसून केलेली ही आतापर्यंतची पहिलीच सर्वांत मोठी कारवाई आहे. पाकच्या सैन्याने भारतीय विमाने पाकमध्ये घुसल्याचे मान्य केेले; मात्र यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त फेटाळले. ही संपूर्ण कारवाई राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रत्यक्ष कारवाईच्या वेळी पंतप्रधान मोदी सर्व माहिती घेत होते. या कारवाईनंतर सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री, गृहमंत्री, तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख आदींची बैठक झाली.

भारताने स्वतःच्या सुरक्षेसाठी कारवाई केली ! – परराष्ट्र सचिव विजय गोखले

भारतीय परराष्ट्र खात्याचे सचिव विजय गोखले यांनी सकाळी पत्रकार परिषद घेऊन या कारवाईविषयी माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘पुलवामा येथील आक्रमणात भारताचे ४० पोलीस हुतात्मा झाले. हे आक्रमण जैश-ए-महंमदकडून करण्यात आले होते. जैश आणि अन्य आतंकवादी संघटना यांच्या आतंकवाद्यांना पाकच्या भूमीत प्रशिक्षण देण्यात येते. याची माहिती पाकला वेळोवेळी देऊनही त्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. आताही जैश भारतात विविध ठिकाणे आत्मघाती आक्रमणे करण्याच्या सिद्धतेत होता, याची गोपनीय माहिती मिळाल्यावर भारताच्या सुरक्षेसाठी आज ही कारवाई करून बालाकोट येथील जंगलात असणारे जैश-ए-महंमदचे प्रशिक्षण केंद्र उद्ध्वस्त करण्यात आले. यात मोठ्या संख्येने आतंकवादी, आत्मघाती आतंकवादी, त्यांचे प्रशिक्षक आणि कमांडर ठार झाले आहेत. ही कारवाई करतांना पाकचे नागरिक किंवा अन्य कोणत्याही ठिकाणाला लक्ष्य करण्यात आले नाही. आमची कारवाई केवळ आतंकवाद्यांच्या विरोधात होती.’’ (वास्तविक भाजप सरकारने ही अटही ठेवू नये; कारण पाकमधील धर्मांधही भारतद्वेषीच असून बहुतांश धर्मांधांचे अशा आतंकवाद्यांना पूर्ण समर्थन आहे. त्यामुळेच पाकमध्ये आतंकवाद फोफावला ! – संपादक)

१. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार बालाकोटसह पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबाद आणि चिकोटी येथील आतंकवादी तळांवरही भारतीय विमानांनी आक्रमणे केली; मात्र गोखले यांनी याविषयी कोणतीही माहिती या वेळी दिली नाही. तसेच त्यांनी निवेदन केल्यावर पत्रकारांसमवेत प्रश्‍नोत्तरे करण्यासही नकार दिला. त्यामुळे याविषयी कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. दुसरीकडे पाकच्या संसदेत बालाकोट आणि मुझफ्फराबाद येथे भारताने आक्रमण केल्याचे म्हटले आहे.

२. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार संरक्षणदलातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारताच्या विमानांनी २१ मिनिटे कारवाई केली. यातील पहिली कारवाई बालाकोट येथे पहाटे ३ वाजून ४५ मिनिटांनी चालू झाली आणि ३ वाजून ५३ मिनिटांनी संपली. बालाकोटमधील जैश-ए-महंमद, लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिदीन यांच्या संयुक्त प्रशिक्षण तळांवर ही कारवाई करण्यात आली. बालाकोटनंतर पहाटे ३.४८ ते ३.५५ अशी ७ मिनिटे मुझफ्फराबाद येथे कारवाई करण्यात आली. यानंतर चाकोटी येथे पहाटे ३.५८ ते ४ वाजून ४ मिनिटांपर्यंत कारवाई  करण्यात आली.

३. बालाकोट हे पाकच्या सीमेपासून ४० किमी अंंतरावर असलेले  शहर आहे. येथून ६२ किमी अंतरावर अबोटाबाद शहर आहे. येथेच अमेरिकेच्या सैन्याने लपून बसलेल्या ओसामा बिन लादेन याला ठार केले होते. वर्ष २००५ मधील भूकंपात बालाकोट उद्ध्वस्त झाले होते.

पाकमध्ये आणीबाणीसारखी स्थिती ! – पाकच्या माजी परराष्ट्रमंत्री हिना रब्बानी

पाकच्या संसदेत पाकच्या माजी परराष्ट्रमंत्री हिना रब्बानी यांनी इम्रान खान यांच्यावर टीका केली. ‘देशात आणीबाणीसारखी स्थिती आहे. इम्रान खान यांनी संसदेत येऊन उत्तर दिले पाहिजे’, अशी त्यांनी मागणी केली.

(म्हणे) ‘पाकला संपवण्याचे भारतियांचे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही !’ – पाकचे परराष्ट्रमंत्री

भारताच्या कारवाईनंतर पाकचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी तातडीची बैठक बोलावली. यात सैन्य आणि सुरक्षा यांविषयी चर्चा करण्यात आली. यानंतर कुरेशी म्हणाले की, पाकला संपवण्याचे भारतियांचे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. (भाजप सरकारने पाकच्या विरोधात कणखर धोरण अवलंबले, तर पाकला संपवण्यासाठी काही घंटे पुरेसे आहेत, हे त्याने लक्षात घ्यावे ! – संपादक)

भारताने स्वरक्षणासाठी आक्रमण केले ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

भारतीय वायूदलाच्या कारवाईनंतर डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी ट्वीट करून, ‘पाकव्याप्त काश्मीर हे आपलेच आहे. संयुक्त राष्ट्रांच्या कायद्यानुसार स्वरक्षणासाठी आपण पाकच्या आतंकवादी तळांवर आक्रमण केले आहे. ‘भारताचे सहस्र तुकडे करू’ असे म्हणणार्‍यांवर भारताने १ सहस्र किलोचे बॉम्ब टाकून योग्य प्रत्युत्तर दिले आहे.’

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्वीट करत ‘भारतीय वायूदलाच्या वैमानिकांना ‘सॅल्यूट’, असे म्हटले आहे.

सैतान मसूद अझहर याला ठार केल्याविना सूड पूर्ण होणार नाही ! – संजय राऊत

शिवसेना नेते संजय राऊत यांनीही वायूसेनेच्या कारवाईचे अभिनंदन केले. त्यांनी ट्वीटमध्ये पुढे म्हटले की, जैश-ए-महंमदचा सैतान मसूद अझहर याला मारल्याविना सूड पूर्ण होणार नाही.

(म्हणे) ‘रिकाम्या तळांवर आक्रमण !’ – ओमर अब्दुल्ला

अशी देशद्रोही विधाने करणार्‍यांना अब्दुल्ला पिता-पुत्रांना सरकार कारागृहात कधी डांबणार ?

काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुला यांनी या कारवाईनंतर ट्वीट करत, ‘हे आक्रमण जर पुंछच्या जवळील बालाकोट भागातील तळांवर करण्यात आले असेल, तर हे मोठे प्रतिकात्मक आक्रमण म्हणावे लागेल; कारण ही आतंकवादी तळे रिकामी आणि कार्यरत नव्हती’, असे म्हटले आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now