बांधकाम चालू असणार्‍या घरांवरील ‘जीएसटी’ १२ वरून ५ टक्के

नवी देहली – केंद्र सरकारने बांधकाम चालू असणार्‍या घरांवरील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) यांत कपात करून तो १२ वरून ५ टक्क्यांवर आणला आहे. तसेच सवलतीच्या घरांवरील जीएसटी देखील ८ वरून केवळ १ टक्क्यावर आणला आहे. जीएसटी परिषदेच्या झालेल्या बैठकीमध्ये हे निर्णय घेण्यात आले.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले की, या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ‘रियल इस्टेट’ क्षेत्राला चालना देण्यासाठी हे पालट केले आहेत. यामुळे अधिकाधिक लोकांना याचा लाभ घेता येईल आणि बांधकाम क्षेत्राला या कपातीचा मोठा लाभ मिळेल. देेहली-एन्सीआर्, कोलकाता, मुंबई, भाग्यनगर, बेंगळूरू आणि चेन्नई या महानगरांमध्ये ६० चौ. मीटर ‘कार्पेट एरिया’पर्यंतची घरे परवडणारी मानली जातील, तर महानगरात न मोडणार्‍या शहरात ९० चौ. प्रतिमीटरची घरे परवडणारी मानली जातील. या घरांची कमाल किंमत ४५ लाख रुपये असेल. हे नवे दर १ एप्रिल २०१९ पासून लागू होतील.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now