६१ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लोेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली गुडगाव (हरियाणा) येथील कु. ओवी जीवन तळेगावकर (वय ६ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. ओवी तळेगावकर एक आहे !

कु. ओवी तळेगावकर

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. ओवी आणि कु. ईश्‍वरी जीवन तळेगावकर या दोघी दैवी बहिणींची जन्मतिथी दोघींत ६ वर्षांचे अंतर असूनही एकच आहे. हे एक आश्‍चर्य आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

माघ पौर्णिमा, म्हणजेच १९ फेब्रुवारी या दिवशी गुडगाव (हरियाणा) येथील बालसाधिका कु. ओवी जीवन तळेगावकर (वय ६ वर्षे) आणि कु. ईश्‍वरी जीवन तळेगावकर (वय १२ वर्षे) या दोघी बहिणींनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे एका सोहळ्यात घोषित करण्यात आले. या सोहळ्याच्या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे हेही उपस्थित होते. यातील कु. ओवी जीवन तळेगावकर हिचा कार्तिक शुक्ल पक्ष चतुर्दशी, वैकुंठ चतुर्दशी (२२.११.२०१८) या दिवशी वाढदिवस झाला, तर कु. ईश्‍वरी जीवन तळेगावकर हिचाही वाढदिवस कार्तिक शुक्ल पक्ष चतुर्दशी, वैकुंठ चतुर्दशी (२२.११.२०१८) या दिवशी झाला.

वाढदिवसानिमित्त आज आपण कु. ओवी हिची तिचे आई-वडील आणि आजी-आजोबा यांना लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत, तर कु. ईश्‍वरी हिची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

१. जन्मापूर्वी

१ अ. आईने नामजप आणि सेवा करणे : ‘मी गर्भारपणी प्रतिदिन श्रीरामरक्षा, मारुतिस्तोत्र आणि विष्णुसहस्रनाम म्हणत असे. मी नामजपही करत असे. मी सत्संगाला आणि प्रासंगिक सेवेला जात असे.

२. जन्मानंतर

२ अ. जन्म ते १ वर्ष

२ अ १. मोठ्याने नामजप केल्यावर रडणे थांबवून शांत होणे : ओवीचे आवरतांना मी नामजप करत असे. त्या वेळी प.पू. भक्तराज महाराज यांची भजनेही लावलेली असत. ती रडायला लागल्यावर मोठ्याने नामजप केला की, ती शांत होत असे.’

– सौ. स्वप्नजा तळेगावकर (आई), गुडगाव, हरियाणा.

२ आ. वय १ ते ३ वर्षे

२ आ १. सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता : ‘तिला बाहेर नेल्यावर मार्गात एखादे देऊळ येण्यापूर्वी ती ‘जय बाप्पा’, असे म्हणून डोके टेकवायची. ‘ती असे का करते ?’, हे आम्हाला नंतर मार्गात देऊळ आल्यावर लक्षात यायचे. संभाजीनगर येथे आल्यावर ती ‘सगळीकडे कृष्ण आहे’, असे सांगत असे.

२ इ. वय ३ ते ५ वर्षे 

२ इ १. साधनेची आवड : संध्याकाळी आरती चालू असतांना ती मोठ्या माणसाप्रमाणे पुटपुटत असे. आम्ही नामजप करत असतांना तीही नामजप करते. ती श्रीरामरक्षा आणि मारुतिस्तोत्र म्हणते.

२ इ २. आध्यात्मिक उपाय करायला आवडणे : आम्ही उपायांसाठी श्रीकृष्णाचे चित्र लावत असतांना तीही ‘मला उपायांची चित्रे लावून दे’, असे सांगत असे.’

– श्री. गणेश आणि सौ. छाया देशपांडे (आजोबा-आजी), संभाजीनगर

२ ई. वय ५ ते ६ वर्षे

२ ई १. उत्तम स्मरणशक्ती : ‘ओवीची मोठी बहीण जे गाणे किंवा श्‍लोक म्हणते, ते २ – ३ वेळा ऐकल्यावर ओवीला लगेच मुखोद्गत होते. ती श्रीरामरक्षा, मारुतिस्तोत्र, मंत्रपुष्पांजली, गायत्री मंत्र, गीतेतील अध्याय आणि लहान संस्कृत श्‍लोक न अडखळता म्हणते.

२ ई २. व्यवस्थितपणा : ती तिच्या कपड्यांच्या घड्या व्यवस्थित करते. ती लहानपणापासूनच तिचे कपाट आवरून ठेवत असे. ती घरातील प्रत्येक वस्तू ठरलेल्या जागेवर ठेवते. ती घर नेहमी स्वच्छ ठेवते.

२ ई ३. आदर्श विद्यार्थिनी : ती शाळेतील नियमांचे पालन करते. ती शाळेत आदर्श विद्यार्थिनी आहे.

२ ई ४. शिकण्याची वृत्ती : ‘मोठ्या बहिणीला जे येते, ते मला यायला पाहिजे’, असे तिला वाटते. तिची ताई पाढे म्हणत असतांना तिने दोनचा पाढा स्वतःहून वाचून पाठ केला.

२ ई ५. कलागुण : तिला श्रीकृष्णाचे चित्र काढायला आवडते. ती ते चित्र छान रंगवते. तिच्या मोठ्या बहिणीचे बघून ती भरतनाट्यम् आणि कथ्थक हे नृत्यप्रकार सहजतेने करते. ती कोणतेही गाणे चांगले म्हणते. ‘जणूकाही तिला उपजतच सूर आणि ताल यांचे ज्ञान आहे’, असे जाणवते.

२ ई ६. सहनशील : तिला काही लागल्यास ती ‘कापूर लाव’, असे सांगते. नवरात्रीच्या काळात ती पडल्यावर तिला २५ टाके पडले, तरीही तिने ते शांतपणे सहन केले. त्या वेळी ‘मला काहीच त्रास होत नाही’, असे ती सांगत होती.

२ ई ७. प्रेमभाव : ती सर्वांशी प्रेमाने वागते. ती घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करते. कुणाला बरे नसल्यास ती त्यांना ‘हवे-नको’, ते विचारून आणून देते.

२ ई ८. ती अंघोळ झाल्यानंतर स्वतःच कुंकू लावते.

२ ई ९. ती पूजेची पूर्ण सिद्धता करून पूजा करते.

२ ई १०. साधनेची आवड : ती मोठ्या प्रार्थना भावपूर्ण म्हणते. ती स्वतःच नामजप करण्याचे नियोजन करते आणि एक घंटा नामजप करते. ती भाववृद्धी सत्संग ऐकते. त्यात सांगितल्याप्रमाणे ती ‘घराला आश्रम करायचा आहे’, असे म्हणू लागली. त्याप्रमाणे दोन्ही मुलींनी मला (सौ. स्वप्नजा यांना) घराची स्वच्छता करायला  साहाय्य करतात. रात्री झोपतांना ती स्वतःकडून आणि आमच्याकडून झालेल्या चुका सांगते.’

– श्री. जीवन आणि सौ. स्वप्नजा तळेगावकर (आई-वडील), गुडगाव, हरियाणा.

२ ई ११. आश्रमात रहायला आवडणे : ‘संभाजीनगर येथे आम्ही रहात असलेल्या घरातच खालच्या मजल्यावर सेवाकेंद्र आहे. ती येथे आल्यावर सेवाकेंद्रातच अधिक वेळ असते. तिला तिथेच महाप्रसाद घ्यायला आवडतो.

२ ई १२. सेवेची ओढ : ती आजोळी आल्यावर जिल्हासेविका कु. चैतालीताईला (कु. चैताली डुबे यांना) ‘सेवा दे’, असा आग्रह करते आणि तिने दिलेली सेवा करते. तिला ग्रंथप्रदर्शनावर सेवा करायला आवडते. दिवाळीच्या वेळी २ दिवस तिला ग्रंथप्रदर्शनाच्या सेवेतून आनंद मिळाला. ‘तिसर्‍या दिवशी सेवेला का गेलो नाही ?’, असेही तिने विचारले.

२ ई १३. संतांच्या सत्संगात रहायला आवडणे

अ. एकदा ती आईला म्हणाली, ‘‘आपण येथे रहायला नको. आपण सगळे रामनाथी आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडे रहायला जाऊ.

आ. एकदा सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे घरी आले असतांना त्यांना पाहून ती म्हणाली, ‘‘परात्पर गुरु डॉक्टरच आले आहेत.’’

इ. एकदा संभाजीनगर येथे सद्गुरु (कु.) स्वाती खाडये आल्या असतांना ती त्यांच्या मांडीवर जाऊन बसली. तिने त्यांना समष्टी प्रार्थना, स्तोत्र आणि शाळेतील गीते म्हणून दाखवली, तसेच नृत्यही करून दाखवले. तिला सद्गुरु स्वातीताई आवडल्या.’

– श्री. गणेश आणि सौ. छाया देशपांडे

३. स्वभावदोष

३ अ. हट्टीपणा : ‘ती रडून स्वतःच्या मनासारखे करून घेते.

३ आ. कौतुकाची अपेक्षा करणे : ‘प्रत्येक व्यक्तीने स्वतःचे कौतुक करावे’, अशी तिची अपेक्षा असते.’

– श्री. जीवन आणि सौ. स्वप्नजा तळेगावकर (१४.११.२०१८)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now