सांगली येथील चि. ईशान कडणे याच्या चौथ्या वाढदिवसाच्या दिवशी त्याची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित

सांगली, २४ फेब्रुवारी (वार्ता.) – लहानपणापासून श्रीराम आणि श्रीकृष्ण यांची आवड असणारा, सात्त्विक वृत्तीचा, तसेच परात्पर गुरु (डॉ.) आठवले यांच्यावर श्रद्धा असणारा चि. ईशान महेश कडणे याने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे २१ फेब्रुवारीला घोषित करण्यात आले. विशेष म्हणजे त्याच दिवशी त्याचा तिथीने (माघ कृष्ण पक्ष द्वितीया) चौथा वाढदिवस होता. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी ही आध्यात्मिक पातळीची आनंदवार्ता सर्वांना दिली. त्यांनी खाऊ देऊन चि. ईशानचा सत्कार केला. या वेळी उपस्थित सर्वांनाच आनंद झाला.

ईशानला देवतांप्रती पुष्कळ ओढ आहे !-  सौ. सरिता कडणे (चि. ईशानची आई)

लहानपणापासूनच ईशानची सर्व देवतांकडे ओढ आहे. तो खेळण्यातील आयुधे घेऊन निरनिराळ्या देवतांची रूपे धारण करतो. त्याची निरीक्षणक्षमता चांगली असून त्याने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जीवनचरित्रातील त्यांची लहानपणीची, तसेच श्रीरामाच्या अवतारातील छायाचित्रे अचूक ओळखली. सकाळपासूनच घरात चैतन्य जाणवत होते आणि ‘काहीतरी आनंदाचे वृत्त कळणार’, असेही वाटत होते.


Multi Language |Offline reading | PDF