देवीला साडी नेसवण्याची पद्धतच ठाऊक नसल्याने ७४ उमेदवार प्रात्यक्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण

कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिरातील पगारी पुजारीपदाच्या परीक्षेतील प्रकार

हा तर मंदिर सरकारीकरणाचा गंभीर दुष्परिणामच ! देवीला साडीच नेसवता येत नसेल, तर असे पगारी पुजारी देवीशी संबंधित पूजाविधी कसे पार पाडतील, याचा विचारच न केलेला बरा ! धर्मशिक्षणाच्या अभावामुळे होत असलेली ही धर्महानी म्हणजे श्री महालक्ष्मीदेवीची अवकृपाच ओढवून घेतल्यासारखे आहे !

कोल्हापूर – येथील श्री महालक्ष्मी मंदिरातील पगारी पुजारीपदाच्या मुलाखतीसाठी आलेल्या ७४ उमेदवारांना देवीला नेसवायची नेहमीची पंखा साडीची पद्धतच ठाऊक नसल्याचे प्रात्यक्षिक परीक्षेच्या वेळी परीक्षकांच्या लक्षात आले. त्यामुळे हे ७४ उमेदवार पुजारीपदाच्या साडी नेसवण्याच्या महत्त्वाच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाले आहेत. (७४ उमेदवार अनुत्तीर्ण होणे, ही नामुष्कीच म्हणावी लागेल ! – संपादक) परीक्षकांनी टिप्पणी अहवालात तसे नमूद केले आहे. याविषयीची माहिती देवस्थान समितीकडून न्याय आणि विधी खात्याला पाठवण्यात येणार आहे, असे मंदिर समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले.

१. मुलाखतीसाठी आलेल्या बहुतांश उमेदवारांना मंदिरातील वर्षभरातील विविध सण, उत्सव आणि नवरात्र उत्सव या काळात देवीला विविध रूपांत परिधान करावयाच्या साडीची पद्धत यांची माहिती नव्हती.  त्यांनी तुळजाभवानीदेवी आणि अन्य देवी यांना नेसवतात, त्याप्रमाणे साडी नेसवण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. ही स्थिती पहाता आता देवस्थान समितीला याविषयीचे प्रशिक्षण देण्यासाठी पुढाकार घ्यावा लागणार आहे.

२. सध्या देवीच्या पूजेसाठी ४ पुजारी असून त्यांना देवीला परिधान करावयाच्या साडीची आणि पूजेची शास्त्रीय माहिती आहे.


Multi Language |Offline reading | PDF