पुलवामामध्ये हुतात्मा झालेले सैनिक हे राजकीय व्यवस्थेचे बळी ! – राज ठाकरे यांचा आरोप

श्री. राज ठाकरे

कोल्हापूर – पुलवामा येथे हुतात्मा झालेले सैनिक हे राजकीय व्यवस्थेचे बळी आहेत. संरक्षण सल्लागार अजित डोवाल यांची कसून चौकशी केल्यास धक्कादायक सत्य बाहेर येईल, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. ठाकरे यांच्या हस्ते कोल्हापुरात ‘महाहिट २४ मनोरंजन आणि वृत्तवाहिनी’चे उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी त्यांनी हा आरोप केला. राज ठाकरे पुढे म्हणाले, ‘‘आगामी निवडणुकीपूर्वी नोटाबंदी ते राफेल घोटाळे विसरण्यासाठी आणखी एखादी मोठी भावनिक घटना घडेल. याचे सर्वांनीच दक्षतेने भान ठेवणे, हे भारतीय लोकशाहीसाठी अत्यावश्यक आहे.’’


Multi Language |Offline reading | PDF