सनातन संस्था हिंदु राष्ट्रासाठी समर्पित भावाने कार्य करत आहे ! – विशेष पोलीस अधीक्षक तथा ब्राह्मण एकता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. जुगलकिशोर तिवारी

कुंभमेळा प्रयागराज २०१९

डावीकडून श्री. कृष्णकुमार सिंह आणि श्री. जुगलकिशोर तिवारी यांना प्रदर्शन दाखवतांना श्री. अभय वर्तक

प्रयागराज (कुंभनगरी), २४ फेब्रुवारी (वार्ता.) – सनातन संस्था अन्य संघटनांना समवेत घेऊन हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी समर्पित भावाने कार्य करत आहे, असे प्रतिपादन विशेष पोलीस अधीक्षक तथा ब्राह्मण एकता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. जुगलकिशोर तिवारी यांनी १९ फेब्रुवारी या दिवशी येथे केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कुंभनगरी येथे लावण्यात आलेले ग्रंथप्रदर्शन आणि धर्मशिक्षण फलकप्रदर्शन यांना भेट दिल्यानंतर ते बोलत होते. या वेळी त्यांच्या समवेत भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी कृष्णकुमार सिंह हेदेखील उपस्थित होते.

या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे उत्तर-पूर्व भारताचे मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस, सनातन संस्थेचे धर्मप्रसारक श्री. अभय वर्तक उपस्थित होते. श्री. जुगलकिशोर तिवारी पुढे म्हणाले, ‘‘व्यक्तीच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत कोणते संस्कार झाले पाहिजे, हे संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वैज्ञानिक पद्धतीने प्रदर्शनातून मांडले आहे. येथील सर्व ग्रंथ जीवनोपयोगी आहे. सर्व पालकांनी या ग्रंथांचा स्वत: अभ्यास करून स्वतःच्या मुलांनाही ती अभ्यासासाठी द्यावी, तरच राष्ट्राची भावी पिढी घडेल. या राष्ट्रात जेवढे संवेदनशील लोक आहेत आणि जे स्वत:ला हिंदु म्हणवून घेण्यात गौरव मानत आहेत, अशा सर्वांनी तन, मन, धन यांद्वारे सनातन संस्थेच्या उपक्रमांना हातभार लावला पाहिजे.’’


Multi Language |Offline reading | PDF