(म्हणे) ‘सत्तेत आल्यास काँग्रेस अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी प्रयत्न करील !’ – काँग्रेस नेते हरीश रावत

देशात ५५ वर्षांपेक्षा अधिक काळ सत्तेत असतांना काँग्रेस हे करू शकली नाही, उलट सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून ‘राम काल्पनिक होता’, असे सांगत स्वतः श्रीरामाने निर्मिलेला रामसेतू तोडण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला, हा इतिहास आहे. असे असतांना रावत कोणत्या तोंडाने ‘राममंदिर बांधू’, असे सांगत आहेत ? आणि जनतेनेही त्यांच्यावर का विश्‍वास ठेवायचा ?

डेहराडून (उत्तराखंड) – जर आमचा पक्ष सत्तेत आला, तर आम्ही अयोध्येत राममंदिर बांधण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करू, असे विधान काँग्रेसचे नेते आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी केले आहे. ‘यापूर्वी सत्तेत असतांना काँग्रेसने २ वेळा राममंदिर बांधण्यासाठी प्रयत्न केले होते आणि डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनीही ते मान्य केले होते’, असा दावाही त्यांनी या वेळी केला. ते येथे पत्रकारांशी बोलत होते.


Multi Language |Offline reading | PDF