सद्गुरुद्वयींनी ‘श्रीं’ बीजमंत्रयुक्त पदक धारण करण्याआधी त्या पदकांची सकारात्मकऊर्जे ची प्रभावळ अन्य पदकांच्या तुलनेत अत्यधिक असण्यामागील आध्यात्मिक कारणमीमांसा

पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ

‘महर्षींच्या आज्ञेनुसार विविध ठिकाणी गुरुपादुकांसमवेत ‘श्रीं’ बीजमंत्रयुक्त पदकांचीही स्थापना करण्यात येणार आहे. यासह महर्षींनी ‘सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनीही ‘श्रीं’ बीजमंत्रयुक्त पदक कंठात धारण करावे’, असे सांगितले आहे. या सर्व पदकांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वसंतपंचमीच्या, म्हणजे १० फेब्रुवारी या दिवशी हस्त स्पर्श केला. या पदकांची ‘यू.टी.एस् (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ चाचणी केल्यावर सद्गुरुद्वयी धारण करणार असणार्‍या पदकांच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ अन्य १७ पदकांच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीपेक्षा अधिक होती. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सर्व पदकांना एकाच वेळी स्पर्श करूनही केवळ या दोन पदकांच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ अत्यधिक असल्याचे लक्षात आले.

सद्गुरुद्वयी धारण करणार असणार्‍या पदकांच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ अन्य पदकांच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीपेक्षा अधिक असण्याचे कारण म्हणजे सद्गुरुद्वयी प्रत्यक्ष कार्य करत असल्याने भगवंताने त्यांच्या पदकांमधील ऊर्जा आधीच कार्यरत केली.’

(प्रत्यक्षात सद्गुरुद्वयींनी माघ पौर्णिमा म्हणजेच १९ फेब्रुवारी या दिवशी ती पदके धारण केली.)

– (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now