विद्यापीठ अनुदान आयोगाकडून वैद्यकीय विद्यापिठांसाठी शुल्क नियमावली लागू !

 

मुंबई – वैद्यकीय विद्यापिठांचे वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांचे शुल्क प्रतिवर्षी २० ते २५ लाख रुपयांपर्यंत आकारले जाते. त्यामुळे आधुनिक वैद्य (एमबीबीएस) होण्यासाठी विद्यार्थ्यांला काही कोटी रुपये व्यय करावा लागतो. हे शुल्क नियमित करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यापिठांसाठी केलेल्या नियमांमध्ये शुल्क नियमनाविषयीच्या नियमांचाही समावेश केला आहे. यामुळे शुल्क नियमन प्राधिकरणाने निश्‍चित केलेल्या शुल्कापेक्षा अधिक शुल्क विद्यापिठांना घेता येणार नाही. तसेच विद्यापिठांना कोणत्याही स्वरूपात निधी किंवा अतिरिक्त शुल्क घेण्यास बंदी करण्यात आली आहे. यामुळे  विद्यापिठांमधील प्रवेशासाठी अतिरिक्त शुल्क घेणे, पावतीमध्ये नमूद असणार्‍या घटकांव्यतिरिक्त अन्य घटकांच्या नावाखाली अधिकचे शुल्क घेणे या प्रकारांना आळा बसणार आहे. या नव्या नियमावलीत प्रवेश देण्यापूर्वी माहितीपुस्तक, संकेतस्थळ यांवर देण्यात आलेल्या शुल्काव्यतिरिक्त कोणतेही शुल्क संस्थांना आकारता येणार नाही. स्वतंत्र प्रवेश परीक्षेसाठीही शुल्क घेता येणार नाही. शुल्क परतावा, प्रवेश रहित करणे, विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्रे राखून न ठेवणे, विद्यापिठांमधील प्रवेश हे राज्य शासनाने निश्‍चित केलेली प्रक्रिया आणि परीक्षा या आधारेच होतील, असे नमूद करण्यात आले आहे. यामुळे गुणवत्ता असूनही शुल्क परवडत नसल्यामुळे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित रहाण्याच्या समस्येवर मात करता येणार आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now