खाद्यपदार्थांच्या वेष्टनावर गव्हाचे पीठ कि मैदा याचा उल्लेख बंधनकारक ! – अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण

मुंबई – दुकानात मिळणार्‍या तयार खाद्यपदार्थांच्या वेष्टनावर गव्हाचे पीठ कि मैदा याचा स्पष्ट उल्लेख नसेल, तर कारवाई करण्याची चेतावणी अन्न आणि औषध प्रशासन यांनी दिली आहे. पदार्थांच्या वेष्टनावर तसा उल्लेख करण्यासाठी आस्थापनांना अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाने ३० मार्चपर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे आता यापुढे आस्थापनांना खाद्यपदार्थांच्या वेष्टनावर तसा स्पष्ट उल्लेख करावा लागणार आहे.

ग्राहकांना अन्नपदार्थांत मैदा आहे कि गव्हाचे पीठ याविषयी अनेकदा माहिती मिळत नाही. केवळ गव्हाच्या कणसाचे चित्र दाखवले जाते; मात्र मैद्याचा वापर केल्याचे सांगण्यात येत नाही. यापूर्वीही अस्तित्वात असलेल्या या नियमाचे उत्पादक आस्थापने पालन करत नसल्याची तक्रार व्यापार्‍यांनी केली होती.

गव्हाच्या पिठासाठी ‘व्हीट फ्लोअर’ असा उल्लेख अपेक्षित असतांना कित्येकदा ‘रिफाईण्ड फ्लोअर’ (चाळलेले पीठ) असे लिहिले जाते. त्यात मैद्याचा वापर असण्याची शक्यता असते. यामुळेही ग्राहकांची फसवणूक होते.


Multi Language |Offline reading | PDF