मुंबईतील रेल्वेस्थानकांवर आक्रमण होण्याची गुप्तचर संघटनांची चेतावणी !

भारतीय आणि मुंबईकर किती दिवस आतंकवादाचे सावट डोक्यावर घेऊन फिरणार ? सर्वपक्षीय सरकारे हे संकट दूर करण्यासाठी निष्प्रभ ठरली आहेत. हे संकट कायमचे संपवण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

मुंबई – येत्या ३ मासांत मुंबईतील गर्दीतील रेल्वेस्थानकांवर आक्रमण होण्याची चेतावणी भारताच्या गुप्तचर संघटनांनी दिली आहे, तसेच लष्कर-ए-तोयबाचे अतिरेकी समुद्रमार्गे मुंबईत घुसणार असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड येथील समुद्र किनार्‍यांवरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात अतीदक्षतेची (हाय अलर्टची) चेतावणी देण्यात आली असून पोलीस यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मुंबईतील रेल्वेस्थानकांवर अतीदक्षता बाळगण्याची सूचना देण्यात आली आहे. सिंधुदुर्गातही पोलीस समुद्रकिनार्‍यावर गस्त घालत आहेत.

विशेषत: देहलीकडून येणार्‍या मेल-एक्सप्रेसमध्ये बॉम्बशोधक पथक आणि श्‍वानपथक यांच्याकडून पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबईच्या लोकलगाड्यांमध्ये प्रतिदिन प्रवास करणार्‍यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. गुप्तचर संघटनेने माहिती दिल्यानंतर रेल्वे मंडळाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलातील वरिष्ठ अधिकारी यांना शोधमोहीम राबवून संशयास्पद व्यक्तींना कह्यात घेण्याचे आदेश दिले आहेत.

रेल्वे पोलीस अधिकार्‍यांनी रेल्वे मंडळाने स्थानकावर अचानक तपासणी करण्याच्या, सीसीटीव्ही चित्रणावर लक्ष ठेवण्याच्या, तसेच स्थानकावर ‘मॉकड्रिल’ (एखाद्या आपत्तीच्या वेळी गडबड-गोंधळ न करता सुरक्षित बाहेर पडण्यासाठी केलेला सराव) करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

रेल्वे पोलिसांनी प्रवाशांना आवाहन केले आहे की, बेवारस वस्तू अथवा संशयित बॅग दिसल्यास त्याची माहिती तातडीने आर्पीएफ् अथवा जीआर्पी कर्मचार्‍यांना द्यावी. प्रवाशांनी अफवा पसरवू नयेत आणि पोलिसांच्या अन्वेषणाला सहकार्य करावे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now