भारतात कोणतीही आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करणार नाही ! – पाकच्या तक्रारीनंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेचा निर्णय

पाकच्या नेमबाजपटूंना व्हिसा नाकारल्याचे प्रकरण

 पाकला आतंकवादी देश घोषित करून त्याच्यासमवेत असलेले सर्व संबंध तोडून टाकण्याचा निर्णय भारत का घेत नाही ?

नवी देहली – पुलवामा आक्रमणानंतर भारताने नवी देहलीत २२ फेब्रुवारीपासून चालू झालेल्या नेमबाजी विश्‍वचषक स्पर्धेत पाकिस्तानच्या २ नेमबाजपटूंना व्हिसा नाकारला होता. याविषयी पाकिस्तानच्या शिष्टमंडळाने तक्रार केल्यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने ‘भविष्यात भारतामध्ये कोणतीही आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित केली जाणार नाही’, असे म्हटले आहे. तसेच २५ मी. ‘रॅपिड फायर पिस्तुल’ स्पर्धेसाठी देण्यात आलेला ऑलिम्पिक कोटाही संघटनेने काढून घेतला आहे. संघटनेने म्हटले आहे की, ‘जोपर्यंत भारत सरकार स्पर्धेत सहभागी असलेल्या प्रत्येक देशाच्या खेळाडूला प्रवेश देण्याविषयी आणि समितीच्या नियमांचे पालन करण्याविषयी लेखी आश्‍वासन देत नाही, तोपर्यंत कोणत्याही प्रकारची चर्चा होणार नाही.’


Multi Language |Offline reading | PDF