हिंदु धर्मग्रंथ वाचून मानसिक शांतता मिळते ! 

लंडन ऑलिम्पिकमध्ये ५ सुवर्णपदक जिंकणार्‍या अमेरिकेच्या जलतरणपटू मिसी फ्रँकलिन यांचे विधान

पाश्‍चात्त्य लोक हिंदूंच्या धर्मग्रंथांचा अभ्यास करून त्याद्वारे मानसिक शांती मिळवतात, याउलट भारतातील अतीशहाणे बुद्धीप्रामाण्यवादी हिंदु धर्मग्रंथांवर टीका करण्यात धन्यता मनतात !

मोनॅको – हिंदु धर्मग्रंथ वाचून मानसिक शांतता मिळते, असे लंडन येथील  ऑलिम्पिकमध्ये ५ सुवर्णपदक जिंकणारी अमेरिकेची जलतरणपटू मिसी फ्रँकलिन यांनी म्हटले आहे.

१. २३ वर्षांच्या फ्रँकलिन यांनी मागील वर्षी खांद्याच्या दुखापतीमुळे निवृत्त होण्याचा निर्णय घेतला होता. निवृत्तीनंतर केवळ मनोरंजन म्हणून योग करण्यास त्यांनी प्रारंभ केला. त्यातून त्यांना हिंदु धर्माची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांच्या मनात अध्यात्माविषयी ओढ निर्माण झाली. आता त्या जॉर्जिया विद्यापिठात धर्माशी संबंधित अभ्यास करत आहेत.

२. फ्रँकलिन म्हणाल्या, ‘‘गेल्या वर्षभरापासून माझा हिंदु धर्माविषयीचा अभ्यास चालू आहे. हिंदु धर्मग्रंथ वाचून मला मानसिक शांतता आणि समाधान मिळाले. त्यामुळे माझे डोळे उघडले. विविध संस्कृती, त्यासंबंधित माणसे, त्यांच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा यांविषयी वाचन करायला मला आवडते.

३. फ्रँकलिन यांना हिंदु धर्माविषयी खूप माहिती आहे. रामायण आणि महाभारत यांविषयी त्यांना पुष्कळ आकर्षण आहे. सध्या त्या हे दोन्ही ग्रंथ वाचत आहेत. याविषयी त्या म्हणाल्या की, या महाग्रंथांमधल्या गोष्टी मला अविश्‍वसनीय वाटतात. त्यातील देवांविषयी जाणून घेणे मला आवडते. या दोन्ही ग्रंथांचे वाचन करण्याचा अनुभव सुंदर आहे. महाभारतातील सर्व नावे माझ्या लक्षात नाहीत. अनेकदा माझा थोडा गोंधळ उडतो; मात्र रामायणातील राम आणि सीता यांच्याविषयी वाचायला मला प्रचंड आवडते.


Multi Language |Offline reading | PDF