सौदी अरेबिया आतंकवादाच्या विरोधात भारतासमवेत ! – राजपुत्र महंमद बिन सलमान

पुलवामा आक्रमणावर मात्र मौन !

‘आतंकवादाच्या विरोधात आहोत’, असे म्हणायचे आणि प्रत्यक्षात ज्या देशाकडून आतंकवाद भारतात घडवला जात आहे, त्यावर सोयीस्कर मौन बाळगायचे, हीच अरबांची मानसिकता आहे, हे भारताने लक्षात घ्यायला हवे !

नवी देहली – आतंकवादाच्या विरोधातील युद्धात सौदी अरेबिया भारतासमवेत आहे, असे भारताच्या दोन दिवसीय दौर्‍यावर आलेले सौदीचे राजपुत्र महंमद बिन सलमान यांनी स्पष्ट केले; मात्र त्यांनी पुलवामा येथील आतंकवादी आक्रमणाचा उल्लेख करण्याचे टाळले. तसेच पाककडून आतंकवाद्यांना देण्यात येणारे आश्रय आणि प्रोत्साहन यांविषयी त्यांनी चिंता व्यक्त केली नाही. ‘आम्ही आतंकवादाविषयी भारताला गोपनीय माहिती पुरवणार’, असे ते म्हणाले. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलमान यांचे स्वागत करून त्यांची गळाभेटही घेतली. या भेटीत दोन्ही देशांमध्ये महत्त्वाचे करारही झाले. त्यानंतर मोदी आणि सलमान यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आतंकवादाच्या सूत्रावर चर्चा केली. मोदी यांनी पुलवामा आक्रमणाचा उल्लेख केला.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now