काश्मीर प्रश्‍नाला नेहरूच कारणीभूत आहेत ! – अमित शहा

नेहरू यांनी हा प्रश्‍न निर्माण केला, तरी यापूर्वी वाजपेयी यांच्या काळात भाजपने हा प्रश्‍न सोडवला नाही आणि आता मोदी यांच्या काळात संपूर्ण बहुमत असतांनाही तो सोडवला नाही; म्हणजेच काँग्रेस आणि भाजप यांच्यात भेद तो काय ?

नवी देहली – काश्मीर प्रश्‍नाला नेहरूच कारणीभूत आहेत. सरदार वल्लभभाई पटेल हे जर देशाचे पंतप्रधान झाले असते, तर काश्मीरचा प्रश्‍न निर्माण झालाच नसता, असे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर, ‘ते राजधर्माचे पालन करत नाहीत’, अशी टीका केल्याच्या पार्श्‍वभूमीवर केले. (सरदार पटेल असते, तर काश्मीरचा प्रश्‍न निर्माणच झाला नसता, हे मान्य आहे; मात्र आता भाजप असतांना तो प्रश्‍न अजून का जिवंत आहे, याचे उत्तर अमित शहा का देत नाहीत ? – संपादक) ‘काँग्रेस यावरून राजकारण करत आहे’, असेही ते म्हणाले. (भाजपही आणखी दुसरे काय करत आहे ? – संपादक)

पुलवामा आक्रमणानंतर पंतप्रधान मोदी चित्रीकरणामध्ये व्यस्त होते ! – काँग्रेसचा आरोप

वर्ष २००८ मध्ये देहलीतील बॉम्बस्फोटांच्या घटनेच्या वेळी तत्कालीन काँग्रेस सरकारमधील गृहमंत्री शिवराज पाटील यांनी एका घंट्यात ४ वेळा कपडे पालटले होते, हे काँग्रेस कशी विसरते ? मोदी यांच्यावरील आरोप खरा असेल, तर काँग्रेस आणि भाजप एकाच माळेचे मणी आहेत, हे जनतेने लक्षात घ्यावे !

नवी देहली – पुलवामा येथील आतंकवादी आक्रमणानंतर संपूर्ण देशाला धक्का बसला होता. त्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘जीम कॉर्बेट नॅशनल पार्क’मध्ये चित्रीकरण करण्यामध्ये व्यस्त होते, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. मोदी यांना राजधर्माचा विसर पडला असून ते सत्ता वाचवण्याच्या मागे लागले आहेत, असा आरोपही त्यांनी केला. (काश्मीरमध्ये मशिदींमधील ध्वनीक्षेपकावरून हिंदूंना त्यांच्या स्त्रिया आणि संपत्ती सोडून जाण्याची धमकी दिल्यानंतर साडेचार लाख हिंदूंनी पलायन केले. त्या वेळी सहस्रावधी हिंदूंना ठार मारण्यात आले, तेव्हा काँग्रेस कोणत्या राजधर्माचे पालन करत होती ? – संपादक)

‘या आक्रमणात हुतात्मा झालेल्या पोलिसांचे पार्थिव देहलीच्या पालम विमानतळावर पोहोचले, त्या वेळी मोदी यांनी तेथे येण्यास एक घंटा विलंब केला; कारण झाशीमध्ये ते राजकारणात व्यस्त होते. भाजपला आतंकवादावरून राजकारण करण्याची घाणेरडी सवय आहे. हुतात्म्यांच्या अंत्ययात्रेत भाजपच्या काही नेत्यांनी केलेले वर्तन लाजिरवाणे होते’, असे सांगत सूरजेवाला यांनी त्याविषयीची छायाचित्रेही दाखवली.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now