‘भावना दुखावतील’ ही सबब देऊन पोलीस हतबलता का व्यक्त करतात ? – उच्च न्यायालय

धार्मिक मिरवणुकींच्या वेळी होणार्‍या ध्वनीप्रदूषणाचे प्रकरण

अशा हतबल पोलीस यंत्रणेमुळेच देशात सर्वत्र कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे ! पोलीस यंत्रणेतील ही त्रुटी दूर करण्यासाठी सरकार ठोस उपाययोजना काढत नाही, हे जनतेचे दुर्दैव !

मुंबई – कायदा आणि सुव्यवस्थेची घडी नीट बसवण्याचे दायित्व असलेले पोलीस धार्मिक भावना दुखावतील आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल, ही सबब देऊन ध्वनीप्रदूषणावर कारवाई करण्याविषयी हतबलता व्यक्तच कशी करतात ? कारवाई न करण्याविषयी पोलीस आयुक्तांनीच आता प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्टीकरण द्यावे. कारवाई न करणार्‍या पोलिसांचे काय करणार ? कारवाईविषयी पोलिसांनीच हतबलता दाखवली, तर सर्वसामान्यांचे काय ? कायद्याचे काय ?, असा संतप्त प्रश्‍न उच्च न्यायालयाने २० फेब्रुवारीला केला.

‘श्री गणेशमूर्ती विसर्जन आणि ईद-ए-मिलाद यांच्या मिरवणुकांच्या वेळी झालेल्या ध्वनीप्रदूषणाच्या संदर्भात कारवाई केल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल’, असे सांगत गेले वर्षभर ध्वनीप्रदूषणाचे नियम न पाळणार्‍यांवर पोलिसांनी कारवाई केली नव्हती. त्यामुळे ‘आवाज फाऊंडेशन’च्या वतीने केलेल्या याचिकेच्या सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपिठाने अशा प्रकरे कडक शब्दांत पोलिसांना दरडावले.  नोव्हेंबर २०१८ मध्ये खार आणि सांताक्रुझ परिसरातून ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीच्या वेळी ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन झाले होते.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now