राफेल करारावर दिलेल्या निर्णयावरील पुनर्विचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार

नवी देहली – राफेल कराराच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला निर्दोष ठरवले होते; मात्र आता यावर प्रविष्ट करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिकेवर सुनावणी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले आहे. अधिवक्ता प्रशांत भूषण आणि अन्य दोघांनी ही पुनर्विचार याचिका प्रविष्ट केली आहे. या दोघांनी या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली होती. त्या वेळी न्यायालयाने ‘लवकरच सुनावणी घेतली जाईल’, असे आश्‍वासन दिले.

१४ डिसेंबरला दिलेल्या निकालामध्ये न्यायालयाने ‘राफेल करारात सरकारच्या निर्णयप्रक्रियेत त्रुटी आढळलेल्या नाहीत’, असे सांगून या कराराची चौकशी करण्याची मागणी फेटाळून लावली होती.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now