कुंभमेळ्यात साधूसंतांना नि:शुल्क सुविधा पुरवू न शकणारे सध्याचे नतद्रष्ट प्रशासन !

कुठे द्वापरयुगात राजधर्माचे पालन करून कुरुक्षेत्री भरलेल्या साधूसंत यांच्या मेळाव्याचे आणि यज्ञोत्सवाचे उत्तमरित्या आयोजन करून पुण्य कमवणारे राजा वसुदेवांसारखे राजे, तर कुठे कुंभमेळ्यात साधूसंतांना नि:शुल्क सुविधा पुरवू न शकणारे सध्याचे नतद्रष्ट प्रशासन !

कु. मधुरा भोसले

‘जेव्हा मी दैनिक सनातन-प्रभातमध्ये ‘प्रयाग येथील कुंभमेळ्यात सरकारने कुंभनगरीत वास करणार्‍या साधूंना वीजपुरवठा न करता त्यांच्याकडून कर वसूल केला आणि काही सुखसुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत’, हे वृत्त वाचले, तेव्हा मी काही दिवसांपूर्वी ‘भक्तीवेदांत बुक ट्रस्ट’ यांच्या ‘श्रीकृष्ण : पूर्ण पुरुषोत्तम भगवान’ आणि श्री. शिवाजी सावंत यांनी लिहिलेले ‘युगंधर’ या श्रीकृष्णाच्या चरित्रातील वाचलेला एक प्रसंग मला आठवला.

द्वापरयुगात कुरुक्षेत्रावर खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी ब्रह्मसरोवर, सन्नेथ सरोवर (सूर्यकुंड), ज्योतिसर सरोवर इत्यादी विविध कुंडांमध्ये राजयोगी स्नान करण्यासाठी भारतातील अनेक राजेरजवाडे, ऋषिमुनी आणि भक्तगण एकत्रित आले होते. तेव्हा यदुकुळाचे प्रमुख आणि श्रीकृष्ण अन् बलराम यांचे पिता राजा वसुदेव यांनी कुरुक्षेत्री आलेल्या सर्वांच्या रहाण्याची आणि सुखसोयींची उत्तम व्यवस्था केली. त्यांनी समस्त ब्राह्मणांना गायी आणि धन दान केले, ऋषिमुनींचे पूजन केले आणि देवतांना प्रसन्न करण्यासाठी विविध यज्ञांचे आयोजन केले. अशा प्रकारे कुरुक्षेत्री राजयोगी स्नान आणि यज्ञोत्सव पार पडले. वसुदेव राजाने त्याच्या राजधर्माचे पालन करून पुण्य कमवले. राजा वसुदेवांप्रमाणे भरतखंडातून कुरुक्षेत्री जमलेल्या अनेक राजांनी त्यांच्या राजधर्माचे पालन करून दानधर्म आणि यज्ञयाग केले. अशा प्रकारे भारतातील प्रयाग येथील कुंभमेळ्याचेही प्रशासनाने चांगल्या प्रकारे आयोजन करून साधूसंत यांना आवश्यक असणार्‍या सुखसुविधा निःशुल्क दिल्या, तर त्यांच्याकडूनही राजधर्माचे पालन होऊन त्यांच्या पदरी पुण्य पडेल. भारतीय प्रशासनाने भारताच्या गौरवशाली इतिहासातील आदर्श हिंदू राजांकडून राजधर्माचे पालन शिकून तसे आचरण केल्यास भारतातील प्रशासनाची ‘दुःशासन’ ही ओळख पालटून ‘योग्य शासन’ ही नवीन ओळख निर्माण होईल.’

– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(२२.१.२०१९, रात्री १०.४०)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now