सनातन संस्थेचे कार्य उत्तरोत्तर वाढत जावो ! – श्री महंत पद्मानंद सरस्वती,उत्तरप्रदेश

श्री महंत पद्मानंद सरस्वती (बसलेले) यांचा ग्रंथ भेट देऊन सन्मान करतांना पू. नीलेश सिंगबाळ

प्रयागराज (कुंभनगरी) – सनातन संस्थेने ‘मनुष्याने जीवन कसे जगावे’, ‘कसे कर्म करावे’, ‘जन्मदिवस साजरा करावा’, या संदर्भात चांगले प्रदर्शन लावले आहे. सनातन संस्था अशीच पुढे वाढत जावो, अशी मी गंगामाता आणि श्री हनुमान यांच्या चरणी प्रार्थना करतो, असे प्रतिपादन उत्तरप्रदेश येथील नागा संन्यास बरसाना आश्रमचे तथा श्री पंच दशनाम जुना आखाड्याचे सचिव श्री महंत पद्मानंद सरस्वती यांनी १९ फेब्रुवारी या दिवशी येथे केले.  सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कुंभनगरी येथे लावण्यात आलेल्या अनुक्रमे ग्रंथप्रदर्शन अन् धर्मशिक्षण फलक प्रदर्शन यांना भेट दिल्यानंतर ते बोलत होते. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे उत्तर-पूर्व भारताचे मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ यांनी त्यांचा पुष्पहार घालून सन्मान केला.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now