शिवजयंती दिनांकानुसार नव्हे, तर तिथीप्रमाणे साजरी करा ! – सुनील पवार, शिवराज्याभिषेक समिती, किल्ले रायगड

कुडाळ – शिवजयंती, शिवराज्याभिषेक हे दिवस तिथीप्रमाणेच साजरे करून आपली परंपरा आणि संस्कृती यांचा सन्मान करूया, असे शिवराज्याभिषेक समिती, किल्ले रायगडचे अध्यक्ष सुनील पवार यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

पवार यांनी पत्रकात म्हटले आहे, ‘‘आपल्याकडे एक अतिशय समृद्ध असे तिथी संवत्सर असलेले पंचांग आहे. शिवकाळातील सर्व घटना या तिथीप्रमाणे नोंदवल्या गेल्या आहेत. शिवकालीन पत्रे पाहिली, तर त्यात कुठेही इंग्रजी दिनांक दिसणार नाही. शिवाजी महाराजांच्या चरित्रात सर्व नोंदी तिथीप्रमाणेच आहेत. आपले पंचाग अतिशय परिपूर्ण आहे. संवत्सर, तिथी आणि दिवस यांची अतिशय विस्तृत नोंदणी आहे. ती सोडून त्या इंग्रजाळलेल्या दिनांकाकडे का वळावे ? आपण आज आपल्या कामासाठी इंग्रजी दिनांक वापरतो. कारण जगभर तो वापरला जातो; पण सणवार आपण तिथीनुसारच साजरे करतो ना ! मग शिवाजी महाराजांचा जन्मदिन आणि राज्याभिषेक दिनांकानुसार का ? संस्कृतीचा मान राखायला हवा.’’

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now