पाकिस्तानला जाणार्‍या ३ नद्यांचे पाणी रोखणार ! – केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची चेतावणी

  • आतापर्यंत ते का रोखले नाही, याचे उत्तर गडकरी यांनी प्रथम द्यायला हवे !
  • ‘भाजप हा विरोधी पक्ष म्हणून कार्यरत असतांना तो पाकच्या विरोधात जे काही बोलत होता, त्याप्रमाणे सत्तेवर आल्यावर गेल्या पावणेपाच वर्षांत त्याने काहीही केलेले नाही, हे जनतेने पाहिले आहे’, हे भाजपने लक्षात ठेवायला हवे !

बागपत (उत्तरप्रदेश) – पाकला दिले जात असलेले ३ नद्यांचे पाणी भारत रोखणार आहे. या निर्णयामुळे पाकला पाण्यासाठी वणवण भटकावे लागेल. ३ नद्यांतील पाणी प्रकल्पाद्वारे यमुना नदीत सोडले जाईल, असे विधान केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी येथे एका सभेमध्ये केेले. यानंतर त्यांनी ट्वीट करून म्हटले की, ‘सिंधू जल करारातून भारताने माघार घेतली आहे. पाकला जाणारे पाणी आता भारत स्वत:साठी वापरणार आहे. या नद्यांचे पाणी आता जम्मू-काश्मीर आणि पंजाबसाठी वापरणार आहोत.’

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now