कर्जत-आपटा बसगाडीत बॉम्ब !

भाजप सरकारच्या राज्यात जनता असुरक्षित आहे, असे कोणी म्हटल्यास चूक ते काय ?

रायगड – आपटा येथे कर्जत-आपटा बसगाडीमध्ये २० फेब्रुवारीच्या रात्री आयइडी बॉम्ब आढळून आला. याविषयीची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर रामनाथ (अलिबाग) येथून बॉम्ब शोधक आणि नाशक पथक आपटा येथे पोहोचले अन् त्यांनी बॉम्ब निकामी केला. जवळजवळ ३ किलो पांढर्‍या रंगाची पावडर आणि डिटोनेटर यांपासून हा बॉम्ब बनवण्यात आला होता. हा बॉम्ब फुटला असता, तर मोठा स्फोट झाला असता.

या पार्श्‍वभूमीवर रायगड जिल्ह्यात अती दक्षतेची चेतावणी देण्यात आली आहे. साडेतीन घंट्यांनतर बसगाडीतील हा बॉम्ब निकामी करण्यात आला. या संपूर्ण कालावधीत रात्रभर ग्रामस्थ घाबरलेल्या मनस्थितीत होते. ९३ च्या बॉम्बस्फोटातील स्फोटके रायगडमधील दिघी बंदरावरून आली होती, या पार्श्‍वभूमीवर या घटनेनंतर सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now