अमेरिकेत भारतियाची हत्या

फ्लोरिडा (अमेरिका) – येथील पेन्साकोला शहरात रहाणारे ४८ वर्षीय भारतीय के. गोवर्धन रेड्डी यांची चेहर्‍यावर मुखवटा लावून आलेल्या अज्ञात व्यक्तीने गोळ्या झाडून हत्या केली. रेड्डी मूळचे तेलंगण येथील यदाद्री भुवानगिरी येथील होते. या हत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. २ मुलींचे पिता असलेले रेड्डी पेन्साकोला शहरात काम करत होते. ७ वर्षांपूर्वी ते अमेरिकेला स्थलांतरित झाले होते. ते एप्रिलमध्ये भारतात येणार होते. यापूर्वी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात अमेरिकेत काही दरोडेखोरांनी तेलंगणातील साई कृष्णा या भारतीय अभियंत्याची गोळ्या झाडून हत्या केली होती.


Multi Language |Offline reading | PDF